• Download App
    गहू, कडधान्ये आणि तेलबियांच्या लागवडीत विक्रमी वाढ; खाद्यतेले आयातीवरची निर्भरता कमी करण्याचा प्रयत्न Rabbi crops : wheat, oilseeds production to be increased in 2023

    गहू, कडधान्ये आणि तेलबियांच्या लागवडीत विक्रमी वाढ; खाद्यतेले आयातीवरची निर्भरता कमी करण्याचा प्रयत्न

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली :  देशात यावर्षी रब्बी हंगामात गव्हाची विक्रमी लागवड झाली आहे. त्यामुळे अन्नधान्याचे कोणतेही संकट येणार नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. गव्हाची विक्रमी लागवड ही सर्वसामान्यांना दिलासा देणारी आहे. त्याचबरोबर कडधान्ये आणि तेलबियांच्या पेरणीतही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे देशाची खाद्यतेलांच्या आयातीवरची निर्भरता मोठ्या प्रमाणावर कमी होऊन परकीय चलन वाचणार आहे. Rabbi crops : wheat, oilseeds production to be increased in 2023

    3.32 कोटी हेक्टरवर गव्हाची लागवड 

    गतवर्षी गव्हाच्या लागवडीची स्थिती फारशी चांगली नव्हती. क्षेत्रफळही कमी होते. त्याचबरोबर उत्पन्नाच्या बाबतीतही गतवर्षी विशेष काही वाढ दिसली नाही. अति उष्णतेचा गव्हाच्या उत्पन्नावर परिणाम झाला होता. त्यामुळे उत्पादनात घट झाली होती. मात्र, यंदा गव्हाच्या पेरणीची परिस्थिती अत्यंत अनुकूल आहे. देशात सर्वाधिक क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली आहे. यंदा गव्हाखालील क्षेत्र गेल्या अनेक वर्षांतील सर्वाधिक आहे. यावर्षी 3.32 कोटी हेक्टर क्षेत्रावर गव्हाची लागवड झाली आहे.



    देशात बटाटा आणि गव्हाची पेरणी अजूनही सुरू आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये बटाट्याची आणि गव्हाची पेरणी सुरू आहे. गेल्या वर्षी गव्हाच्या उत्पादनाचे निश्चित उद्दिष्ट 112 दशलक्ष टन ठेवण्यात आले होते. यंदा निर्धारित उद्दिष्टापेक्षा अधिक गव्हाचे उत्पादन होम्याची शक्यता आहे. खरीप हंगामाच्या शेवटी झालेल्या पावसामुळं यावेळी हवामानात ओलावा अधिक असल्याचं तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हिवाळाही लांबणार आहे. गव्हाच्या पेरणीसाठी हवामान उत्तम राहील. त्यामुळं तज्ज्ञांच्या आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊन आपल्या शेतात गव्हाची पेरणी करत आहेत.

    कडधान्य, तेलबियांच्या लागवडीतही वाढ 

    चालू हंगामात 1.58 कोटी हेक्टर क्षेत्रावर कडधान्य पिकांची पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी या वेळेपर्यंत 1.56 कोटी हेक्टरवर पेरणी झाली होती. हरभऱ्याचा पेरा गेल्या वर्षीच्या 1.09 कोटी हेक्टरच्या तुलनेत 1.07 कोटी हेक्टर झाला आहे. हरभऱ्याखालील क्षेत्रात यंदा घट झाली आहे. दुसरीकडे तेलबिया पिकांच्या पेरणीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. गेल्या वर्षी 97.66 लाख हेक्टरवर तेलबिया पिकांची पेरणी झाली होती. यंदा हा आकडा वाढून 1.05 कोटी हेक्टर झाला आहे.

    Rabbi crops : wheat, oilseeds production to be increased in 2023

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!