वृत्तसंस्था
नवी दिल्ली : रस्ते वाहतूक मंत्रालयाने सध्याच्या कार मॉडेलमध्ये पुढील सीटसाठी दोन एअरबॅगची अनिवार्यता पुढे ढकलली आहे. कोरोना संकटामुळे हा निर्णय घेतला गेला आहे. Pushed forward the necessity of front passenger airbags; Extended till 31st December 2021
सध्याच्या कार मॉडेलसाठी केवळ ड्रायव्हर सीट एअरबॅग अनिवार्य आहे. ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत फ्रंट पॅसेंजर एअरबॅगची अनिवार्यता पुढे ढकलली आहे. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्यूफॅक्चरर्सने वेळ मागितल्याचं एका अधिकाऱ्याने सांगितलं. त्यामुळे नववर्षात बाजारात येणाऱ्या सर्व नव्या कारच्या मॉडेलसाठी एअरबॅग असणे अनिवार्य होणार आहे.
केवळ चार महिने दिलासा
१ एप्रिल २०२१ आणि त्यानंतर निर्मित होणाऱ्या वाहनांमध्ये आणि सध्याच्या मॉडेलसाठी ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत ड्रायव्हरसह पुढील सीटवर बसणाऱ्या व्यक्तीसाठीही एअरबॅग असणं अनिवार्य करण्यात आलं. परंतु आता ही अनिवार्यता पुढे ढकलण्यात आली आहे.
Pushed forward the necessity of front passenger airbags; Extended till 31st December 2021
महत्त्वाच्या बातम्या
- बोलतो त्याप्रमाणे चालतो याचा अर्थ वाघ सर्कशीतलाच, त्याचा रिंगमास्टरही वेगळा, नारायण राणे यांचा शिवसेनेला टोला
- ओबीसी आरक्षणात आता चर्चा देवेंद्र फडणवीस यांच्या विवाहाची
- कुणी आम्हाला डिवचले, धमकी दिली तर धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
- गांधी परिवारवादाचे ठीक आहे, पण “असे” राजकीय वारसे सोडून दिल्याने विरोधकांच्या हातात आयते कोलित मिळते त्याचे काय…??