वृत्तसंस्था
चंडीगड : पंजाब मधल्या आम आदमी पार्टी सरकारला आज 16 मार्च 25 रोजी तीन वर्षे पूर्ण झाली आणि आता अरविंद केजरीवाल तसेच मुख्यमंत्री भगवंत माने यांनी ड्रग्स आणि भ्रष्टाचार यांच्याविरुद्ध लढण्याची घोषणा केली. पण त्यामुळे गेल्या तीन वर्षात भगवंत मान यांच्या सरकारने नेमके केले काय??, असा सवाल तयार झाला.Punjab Aam Aadmi Party government completes three years Now Kejriwal Mann will fight drugs and corruption
फेब्रुवारी 2022 मध्ये पंजाब विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्यावेळी आम आदमी पार्टीने तिथल्या काँग्रेस सरकारचा पराभव केला. प्रचंड बहुमताने पंजाब मध्ये सरकार स्थापन केले. कुठल्याही प्रादेशिक पक्षाचे आपले राज्य सोडून दुसऱ्या राज्यात सरकार स्थापन करण्याचे हे पहिले उदाहरण ठरले. कारण त्यावेळी आम आदमी पार्टी दिल्लीतही सत्तेवर होती.
पण पंजाब मधले आम आदमी पार्टीचे सरकार तीन वर्षे पूर्ण करत असताना त्या पक्षाची दिल्लीतली सत्ता मात्र हातातून निसटली. केजरीवाल राजकीय दृष्ट्या बेरोजगार झाले. पण पंजाब सरकारच्या तीन वर्षांच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन साजरे करण्यासाठी ते चंडीगडला पोहोचले. तिथेच त्यांनी मुख्यमंत्री भगवंत माने यांच्याबरोबरीने उभे राहून पंजाब मधल्या ड्रग्स आणि भ्रष्टाचाराशी लढण्याची घोषणा केली. पण त्यामुळेच गेल्या तीन वर्षात हा मागणी पार्टीच्या सरकारने पंजाब मध्ये काय केले??, असा सवाल तयार झाला. या तीन वर्षात मुख्यमंत्री भगवंत मान कुठल्या ना कुठल्या वादात अडकत गेले. त्यांनी केलेल्या परदेश दौऱ्यांमध्ये ते विमानात दारू प्यायल्याचे प्रकरण गाजले. पंजाबची आर्थिक हालत खस्ता झाली. त्यामुळे अनेक सरकारी योजना बंद कराव्या लागल्या. पण तरीही केजरीवाल आणि मान यांनी ड्रग्स आणि भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई जोमात करायची घोषणा केली.
Punjab Aam Aadmi Party government completes three years Now Kejriwal Mann will fight drugs and corruption
महत्वाच्या बातम्या
- Election Commission : निवडणूक आयोगाकडून मतदार ओळखपत्र आधारशी जोडण्याची तयारी सुरू
- साखर कारखान्यांच्या निवडणुकीत पवारांची “खेळी”; मुलीला “सेफ” ठेवून पुन्हा नातवाचाच राजकीय बळी!!
- Baloch Liberation : बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानवर केला आणखी एक मोठा हल्ला
- AI : एआय अन् ड्रोनच्या मदतीने महिलांवर लक्ष ठेवत आहे इराण