विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – पंतप्रधानांना अनेक दहशतवादी संघटनांकडून धोका आहे. तसेच राज्यातील शेतकरी संघटनांकडून आंदोलने होण्याची शक्यता आहे,“ असा अहवाल केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी पंतप्रधानांच्या पंजाबदौऱ्यापूर्वी राज्य पोलिसांना पाठविला असल्याची माहिती पुढे आली आहे.Punjab police had been alerted before the PM’s visit
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इंडियन मुजाहिदीन, एक्स-स्टुडंट इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया, काश्मिरी आणि पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्करे तैय्यबा, जैशे मोहम्मद, हरकत उल मुजाहिदीन, हरकत उल मुजाहिदीन हरकत उल जिहाद ए इस्लामी,
तेहरिके तालिबान पाकिस्तान आणि हिज्बुल मुजाहिदीन व्यतिरिक्त पाकिस्तानस्थित शीख दहशतवाद्यांपासून धोक्याची शक्यता केंद्रीय यंत्रणांनी वर्तविल्याची माहिती आहे.सप्टेंबरमध्ये फिरोजपूर आणि लगतच्या जिल्ह्य़ांमध्ये इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (आयईडी) स्फोटके
आणि फिरोजपूरमधील एका गावात टिफिन बॉम्ब जप्त केल्याच्या घटनांचा उल्लेख सुरक्षा यंत्रणांनी अहवालात केला होता.अहवालात असेही म्हटले होते की, डाव्या विचारसरणीच्या दहशतवादी आणि लिबरेशन टायगर्स ऑफ तमीळ इलम (एलटीटीई) व त्यांच्या साथीदारांकडून पंतप्रधानांना धोका आहे.
Punjab police had been alerted before the PM’s visit
महत्त्वाच्या बातम्या
- जगभरात अवघ्या २४ तासांत २५ लाख जणांना कोरोनाची लागण
- पाच राज्यांत निवडणुका घेण्यासाठी एकमेव सुरक्षित मार्ग म्हणजे ८० टक्के लसीकरण, प्रशांत किशोर यांचा निवडणूक आयोगाला सल्ला
- अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बायडेन पुन्हा बरसले
- कोरोनाचा संसंर्ग असूनही भाऊ खुलेआम फिरत असल्याने ममता बॅनर्जी संतप्त
- इटलीतून आलेल्या १९० प्रवाशांना कोरोना, अमृतसर विमानतळावर गोंधळ; दुसरी धक्कादायक घटना