पंजाब सीमेवर पोलीसांनी चक्क एका पाकिस्तानी कबुतराला अटक केलीआहे. या कबुतराच्या पायाशी एक चिठ्ठी बांधळी असून त्यावर एक नंबर लिहिला आहे. हे कबुतर हेरगिरीसाठी वापरले जात असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.Punjab police arrest Pakistani pigeon
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंजाब सीमेवर पोलीसांनी चक्क एका पाकिस्तानी कबुतराला अटक केलीआहे. या कबुतराच्या पायाशी एक चिठ्ठी बांधळी असून त्यावर एक नंबर लिहिला आहे. हे कबुतर हेरगिरीसाठी वापरले जात असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
भारत-पाकिस्तान सीमारेषेवर कमालीची सुरक्षा असून येथे परींदा भी पर नहीं मार सकता ही उक्ती तेथे खरी ठरली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात रोरनवाला इथल्या सीमारेषेजवळ हा प्रकार घडला आहे.
सीमारेषेवरच्या पोस्टवर कॉन्स्टेबल नीरज कुमार ड्युटीवर होते. ही पोस्ट पाकिस्तानच्या सीमारेषेपासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर आहे. १७ एप्रिल रोजी नीरज कुमार कॅम्प पोस्टवर ड्युटीवर असताना अचानक एक काळ्या-पांढऱ्या रंगाचं कबुतर नीरज कुमार यांच्या खांद्यावर येऊन बसले.
नीरज कुमार यांनी प्रसंगावधान राखून लागलीच त्या कबुतराला पकडलं. पोस्ट कमांडर ओमपाल सिंग यांना नीरज कुमार यांनी माहिती दिली. ओमपाल सिंग यांनी कबुतराची काळजीपूर्वक पाहणी केली! नीट निरीक्षण करून पाहिल्यानंतर ओमपाल सिंग यांना कबुतराच्या पायाशी काहीतरी बांधल्याचं दिसलं.
ओमपाल सिंग यांनी पायाला चिकटवलेला कागद मोकळा करून पाहिल्यानंतर त्यात एक नंबर लिहिलेला त्यांना दिसला. 03024103346 हा नंबर एखाद्या लँडलाईनचा असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
हा नंबर सापडल्यानंतर पंजाब पोलिसांनी या कबुतराविरुद्ध अमृतसरच्या काहागड पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल केला आहे. गेल्या वर्षी देखील अशाच प्रकारचं एक कबुतर जम्मू-काश्मीरच्या कथुआ जिल्ह्यात सापडलं होतं.
या कबुतराला पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण दिलं असून तो कोडवर्डमधला एक संदेश घेऊन आला होता, असं प्रशासनाकडून नंतर स्पष्ट करण्यात आलं.
Punjab police arrest Pakistani pigeon
महत्त्वाच्या बातम्या
- मास्क न घालण्याचा आदेश देणारा इस्त्राइल बनला जगातील पहिला देश, लसीकरणामुळे ब्रिटनमध्ये कोविडचा वेग घसरला
- ममतादिदींच्या कथनी व करनीमध्ये फरक, जाहीर शब्द फिरवत बुवा – भतिजांनी घेतल्या जाहीर सभा
- गुजरातमध्ये नवे तज्ज्ञ डॉक्टरना आकर्षक मानधन, कोरोना रुग्णांवर होणार खासगी रुग्णालयांत उपचार
- जगप्रिसद्ध ॲपलकडून ऐन कोरोना काळात ‘एअर टॅग’, ‘आयपॅड प्रो’ बाजारात दाखल