• Download App
    पंजाब मध्ये पेट्रोल डिझेल वरचा कर वाढवून मुख्यमंत्र्यांचे दिल्लीत आम आदमी पार्टीच्या रॅलीत महागाई विरोधात भाषण!!Punjab government increased VAT on petrol diesel, chief minister spoke against inflation in aap rally in delhi

    पंजाब मध्ये पेट्रोल डिझेल वरचा कर वाढवून मुख्यमंत्र्यांचे दिल्लीत आम आदमी पार्टीच्या रॅलीत महागाई विरोधात भाषण!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंजाब मध्ये आम आदमी पार्टीच्या सरकारने पेट्रोल डिझेलवरचा मूल्यवर्धित कर वाढविला आहे. त्यामुळे पंजाब मध्ये पेट्रोल डिझेलचे दर 100 वर पोहोचले आहेत. पण ज्यांनी हे कर वाढवले त्या मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज दिल्लीत आम आदमी पार्टीच्या रॅलीत महागाई विरोधात जोरदार भाषणे ठोकले. Punjab government increased VAT on petrol diesel, chief minister spoke against inflation in aap rally in delhi

    पंजाब मध्ये आम आदमी पार्टी सरकारने वेगवेगळ्या मोफत योजना चालवल्या आहेत. पण या योजना चालवताना सरकारी तिजोरी रिकामी होत असल्याचे पाहून त्याची भरपाई वेगवेगळे कर वाढवून सरकार करत आहे. पेट्रोल डिझेलवरचा मूल्यवर्धित कर वाढवणे हा त्याचाच एक भाग आहे. पण हा कर वाढवण्याच्या दिवशी मुख्यमंत्री भगवंत माने यांनी मात्र दिल्लीतल्या आम आदमी पार्टीच्या रॅलीत महागाई विरुद्ध भाषण ठोकत केंद्रातील मोदी सरकारला घेरले.

    दिल्ली सरकारचे अधिकार हनन करणारा अध्यादेश केंद्र सरकारने मंजूर करण्याविरोधात आम आदमी पार्टीने रामलीला मैदानावर आज रॅली केली. त्यात काँग्रेसच्या g-23 चे नेते कपिल सिब्बल यांनी देखील भाग घेतला.


    दिल्लीत आम आदमी पार्टीला मोठा धक्का, जिल्हाध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश!


    दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही रॅली करण्यापूर्वी महाराष्ट्रात येऊन शरद पवार, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या देखील भेटीगाठी घेतल्या. त्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या अपॉइंटमेंट मागितली. पण त्यांना अद्याप ती मिळालेली नाही.

    जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केजरीवाल यांच्या या “पॉलिटिकल टुरिझम”वर जोरदार टीका केली. 2019 मध्ये जेव्हा 370 कलम हटविले होते तेव्हा केजरीवाल जम्मू-काश्मीर मधल्या पक्षांच्या मदतीला आले नव्हते आणि आता त्यांचे सरकार जेव्हा अडचणीत आले, तेव्हा ते आमचे दरवाजे ठोठावत आहेत, असे शरसंधान अब्दुल्ला यांनी केजरीवाल यांच्यावर साधले.

    या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने दिल्लीत रॅली केली, ती फक्त एकाच पक्षाची रॅली झाली. बाकीच्या पक्षाच्या नेत्यांनी त्या रॅलीकडे पाठ फिरवली. केजरीवाल यांनी एवढ्या भेटीगाठी घेतल्या पण रॅली करण्याच्या बाबतीत बाकीच्या पक्षांनी त्यांना फारसा प्रतिसाद दिला नाही हेच आज दिसले.

    Punjab government increased VAT on petrol diesel, chief minister spoke against inflation in aap rally in delhi

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट