• Download App
    पंजाब सरकारचा मोठा निर्णय : आंदोलनादरम्यान मृत झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना सरकारी नोकऱ्या, मंत्रिमंडळाने दिली मंजुरी । Punjab Cabinet gave ex post facto approval for government jobs to heirs of farmers who died during agitation

    पंजाब सरकारचा मोठा निर्णय : आंदोलनादरम्यान मृत झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना सरकारी नोकऱ्या, मंत्रिमंडळाने दिली मंजुरी

    government jobs to heirs of farmers who died during agitation : कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखालील पंजाब सरकारने गुरुवारी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान मृत पावलेल्या 104 शेतकरी/शेतमजुरांच्या वारसांना सरकारी नोकऱ्या देण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. Punjab Cabinet gave ex post facto approval for government jobs to heirs of farmers who died during agitation


    विशेष प्रतिनिधी

    चंदिगड : कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखालील पंजाब सरकारने गुरुवारी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान मृत पावलेल्या 104 शेतकरी/शेतमजुरांच्या वारसांना सरकारी नोकऱ्या देण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

    अशा सर्व मृत आंदोलकांच्या कुटुंबीयांना रोजगार मिळेल याची खात्री करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागांना दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केले की, केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनात प्राणांची आहुती देणाऱ्या पंजाबच्या सर्व शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये सामावून घ्यायचे आहे.

    21 नोव्हेंबर 2002 च्या पंजाब सरकारच्या अनुकंपा नियुक्ती धोरणाअंतर्गत समाविष्ट नसलेल्या उमेदवारांना शिथिलता देताना मंत्रिमंडळाने मुख्यमंत्र्यांना नियमांमध्ये आणखी कोणतेही बदल करण्याचे अधिकार दिले. हे धोरण सरकारी कर्मचारी आणि त्या व्यक्तींना लागू आहे, ज्यांचा राष्ट्राच्या सुरक्षेसाठी लढा देताना मृत्यू झाला आहे.

    कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलनादरम्यान मृत पावलेल्या शेतकरी/शेतमजुरांच्या कायदेशीर वारसांची प्रकरणे धोरणात समाविष्ट नव्हती. ज्यांना मंजुरी/सूट आवश्यक होती. त्याला आता मंजुरी मिळाली आहे. मंत्रिपरिषदेच्या निर्णयानुसार, संबंधित डीसीने शिफारस केलेल्या आई, वडील, विवाहित भाऊ, विवाहित बहीण, विवाहित मुलगी, सून, नातू, नातवंडे इत्यादी रोजगारासाठी पात्र असतील.

    Punjab Cabinet gave ex post facto approval for government jobs to heirs of farmers who died during agitation

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!