• Download App
    Punjab Assembly Election 2022 Results: पंजाबमध्ये ऐन मजधारेत कॅप्टन बदलला; काँग्रेसची बोट रसातळाकडे; मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी, नवज्योत सिंग सिद्धू, कॅप्टन अमरिंदरसिंग पिछाडीवर!! । Punjab Assembly Election 2022 Results

    Punjab Assembly Election 2022 Results: पंजाबमध्ये ऐन मजधारेत कॅप्टन बदलला; काँग्रेसची बोट रसातळाकडे; मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी, नवज्योत सिंग सिद्धू, कॅप्टन अमरिंदरसिंग पिछाडीवर!!

    वृत्तसंस्था

    चंदीगड : पंजाब मध्ये ऐन मजधारेत बोटीचा कॅप्टन बदलण्याचा खामियाझा काँग्रेसला भोगायला लागला असून काँग्रेसचा नवा कॅप्टन आणि उपकॅप्टन यांच्यासह काँग्रेसची बोट बुडण्याच्या मार्गावर आहे. मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू हे दोघेही आपापल्या मतदार संघात पिछाडीवर आहेत, इतकेच नाही तर माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग हे देखील पटियाला मधून विचार पिछाडीवर आहेत. पंजाब मध्ये काँग्रेस हायकमांडने हस्तक्षेप करून अयोग्य वेळी अयोग्य निर्णय घेत कॅप्टन बदलला आणि काँग्रेसची बोट रसातळाला चालली आहे…!! Punjab Assembly Election 2022 Results

    एक्झिट पोलने वर्तवलेल्या अंदाजानुसार पंजाब विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत आम आदमी पक्षाने सुरुवातीच्या कलात आघाडी घेतली आहे. राज्यात आम आदमी पार्टीला दणदणीत यश मिळण्याची शक्यता दिसत आहे.



    सकाळी ९ वाजेपर्यंत पंजाबमध्ये आपने ४१ जागांवर आघाडी घेतली आहे. तर सत्ताधारी काँग्रेसपक्ष २५ जागांवर आघाडीवर आहे. शिरोमणी अकाली दर आणि भाजप हे अनुक्रमे ९ आणि ५ जागांवर आघाडीवर आहेत. राज्यातील सत्ताधारी काँग्रेस पक्षातील महत्त्वाचे नेते नवज्योत सिंह सिद्धू त्याच्या अमृतसर ईस्ट या मतदारसंघातून पिछाडीवर असल्याचे दिसते. तर माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह पटियाळा मतदारसंघातून पिछाडीवर आहेत. इतक नव्हे तर मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी हे भदोडमधून सध्या पिछाडीवर आहेत. मुख्यमंत्री चमकौर साहिब या मतदारसंघातून देखील निवडणूक लढवत आहेत.

    मतमोजणीला सुरुवात होण्याआधी मुख्यमंत्री चन्नी, आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान यांनी गुरुद्वारा साहिब येथे जाऊन दर्शन घेतले. पंजाबमध्ये २० फेब्रुवारी रोजी ११७ जागांसाठी मतदान झाले होते. राज्यातील बहुमतासाठी ५९ जागांची गरज आहे. गेल्या काही वर्षात राज्यात अकाली दल आणि काँग्रेसचा दबदबा दिसला आहे.

    Punjab Assembly Election 2022 Results

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले