- आयपीएल 2021: CSK आयपीएलच्या सध्याच्या हंगामात प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरला. संघाचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडची कामगिरी आतापर्यंत उत्कृष्ट राहिली आहे.
- त्याने शनिवारी राजस्थानविरुद्ध नाबाद 101 धावा केल्या. त्याच्या टी -20 कारकिर्दीतील हे पहिले शतक आहे.यासह त्याने 500 धावा देखील पूर्ण केल्या आहेत.
- शेवटचा चेंडू हवेत मारताच सेलिब्रेशन करायला सुरुवात केली होती. तो चेंडू बॅटला लागताच त्याला जाणीव झाली होती की, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार आहे. त्यामुळे त्याने चेंडूकडे पाहिले सुद्धा नाही आणि सेलिब्रेशन करायला सुरुवात केली.
विशेष प्रतिनिधी
अबू धाबी : युवा फलंदाज पुण्याच्या ऋतुराज गायकवाडने आयपीएल 2021 मध्ये चमकदार कामगिरी केली आहे. CSK सोबत खेळताना 24 वर्षीय युवा फलंदाजाने शनिवारी राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्ध नाबाद 101 धावा केल्या.ऋतुराज गायकवाडने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या डावाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारत त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिले शतक ठोकले. Pune : Ruturaj Gaikwad’s `Desert Storm`! Celebration of IPL hero before scoring century…. this is called Confidence!
त्याच्या टी -20 कारकिर्दीतील हे पहिले शतक आहे. त्याने चालू हंगामात 3 अर्धशतके देखील ठोकली आहेत. आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने 3 आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने आतापर्यंत एक अर्धशतक झळकावले आहे. म्हणजेच, दोघे मिळून फक्त 4 वेळा 50 पेक्षा जास्त धावांचा डाव खेळू शकले आहेत, एकट्या ऋतुराजने असे केले आहे. तसेच चालू हंगामात 500 धावा करणारा तो पहिला फलंदाज बनला आहे.ऋतुराजच्या या विक्रमांकडे पाहता पुन्हा एकदा पुणे तेथे काय उणे हे सिद्ध झाले आहे.
आयपीएल 2021चा 47 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात पार पडला. हा सामना हंगामातील सर्वात मनोरंजक सामन्यांपैकी एक ठरला आहे.
चाहत्यांमध्ये नेहमीच कोणत्या खेळाडूने किती मीटरचा षटकार मारला, यासाठी उत्सुकता असते. आयपीएलच्या 14 व्या हंगामात तो मान ऋतुराज गायकवाडने पटकावला आहे. राजस्थानविरुद्धच्या 2 ऑक्टोबरला झालेल्या सामन्यात त्याने 108 मीटरचा षटकार मारून हा विक्रम केला आहे.
आयपीएल 2021 स्पर्धेत ऋतुराजच्या एकूण 508 धावा झाल्या आहेत. त्याने पंजाबच्या केएल राहुलला मागे टाकत ऑरेंज कॅप मिळवली आहे. के एल राहुलच्या एकूण 489 धावा आहेत
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2021 मध्ये शनिवारी राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना झाला. CSK सलामीवीर ॠतुराज गायकवाडने या सामन्यात दणक्यात शतक झळकावले. आयपीएलमधील हे त्याचे पहिले शतक आहे. गायकवाडने 60 चेंडूत 101 धावा केल्या. त्याने आपल्या शतकादरम्यान 9 चौकार आणि 5 षटकार मारले. ऋतुराजने CSK च्या डावाच्या शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारून आपले शतक पूर्ण केले. गायकवाडने षटकार ठोकल्यानंतर ज्याप्रकारे जल्लोष केला, त्याच्या चाहत्यांना टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राची आठवण झाली.
ऋतुराजला आपले शतक पूर्ण करण्यासाठी 5 धावांची गरज होती. सीएसकेच्या डावाच्या शेवटच्या चेंडूवर त्याने जोरदार शॉट मारला. त्यानंतर त्याने चेंडूकडे न पाहता आपले शतक साजरे करण्यास सुरुवात केली.
ज्या शक्तीने त्याने चेंडू मारला तो चेंडू षटकारासाठी जाईल हे त्याला माहीत होते. त्यामुळे त्याने मैदानावर century साजरी करायला सुरुवात केली. 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाला फेकल्यानंतर जशी नीरज चोप्राने विजय साजरा करण्यास सुरवात केली होती. अगदी तशीच confidence level काल मराठमोळ्या ऋतुराजने दाखवून दिली.
हे हटके सेलिब्रेशन पाहून चाहत्यांना गोल्डन बॉय नीरज चोप्राची आठवण आली. कारण नीरज चोप्राने देखील टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत सर्वात लांब भाला फेकताच त्याने सेलिब्रेशन करायला सुरुवात केली होती. त्यानंतर त्याच थ्रोने त्याला सुवर्णपदक मिळवून दिले होते.
Pune : Ruturaj Gaikwad’s `Desert Storm`! Celebration of IPL hero before scoring century…. this is called Confidence!
महत्त्वाच्या बातम्या
- सशक्त, आत्मनिर्भर भारतासाठी शपथ घ्या, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आवाहन
- लालूप्रसादांच्या घरात उफाळून आली भाऊबंदकी, तेजस्वीने लालूंना दिल्लीत कोंडून ठेवल्याचा धाकटा भाऊ तेजप्रतापचा आरोप
- रामदास कदम खोटारडे, शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवींची टीका
- जलयुक्त शिवारमुळे नव्हे, तर नद्यांमधील अवैध वाळू उपशामुळे पूर; फडणवीसांचा ठाकरे – पवार सरकारला टोला