विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पुण्यात इंजिनिअरींगचे शिक्षण घेतलेल्या एका इंजिनिअरला गूगल कंपनीत तब्बल ३.३० कोटी रुपयांची नोकरी मिळाली आहे. विशेष म्हणजे त्यांचे शालेय शिक्षण हिंदी माध्यमातून झाले आहे.Pune learned engineer gets Rs 3.30 crore job at Google
श्रीधर चंदन असे या इंजिनिअरचे नावआहे. त्यांचे मुळ गाव राजस्थानमधील अजमेर येथील आहे. तेथेच त्यांचे शालेय शिक्षण झाले.त्यानंतर पुण्यातील इंजिनिअरींग कॉलेजमध्ये बीई पूर्णकेले.श्रीधर शालेय जीवनापासून अभ्यासात पुढे होते. पुण्यातून त्यांनी कॉँप्युटर सायन्स या क्षेत्रातून पदवी घेतली.
सर्वप्रथम त्यानं हैदाबादमधील इंफोसिसमध्ये नोकरी केली. 2012 मध्ये ते स्नातक पदवीसाठी अमेरिकेला गेले. तेथे वर्जिनीया विद्यापीठातून ही पदवी घेतल्यानंतर त्यांना ब्लूमबर्गमध्ये नोकरी मिळाली. न्यूयॉर्कस्थित ब्लूमबर्ग या कंपनीमध्ये सिनीयर इंजिनीयर या पदावर नोकरी करत आहे. नुकतीच त्यांना सिनीयर ग्रुप इंजिनीयर या पदावर गूगलमध्ये नियुक्ती मिळाली आहे.
३१ डिसेंबर १९८५ रोजी जन्म झालेले श्रीधर चंदन लहानपणापासूनच अत्यंत हुशार विद्यार्थी होते. अभ्यासाशिवाय त्यांना दुसरे काहीही सुचत नसे. अगदी आई-वडीलांनाही कधी कधी सांगावे लागे की बाबा आता अभ्यास बंद कर. ते कायम मेरीटमध्ये येत.
बारावीमध्ये अखिल भारतीय स्तरावरील अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली. पुण्यातील इंजिनिअरींग कॉलेजमध्ये त्यांना प्रवेश मिळाला. कॅम्पस इंटरव्ह्यूमध्येच त्यांना इन्फोसिसमध्ये नोकरी मिळाली होती.
श्रीधर यांच्या वडीलांनी अत्यंत हलाखीत आपले शिक्षण पूर्ण केले. कोळशाच्या वखारीत त्यांनी काम केले. पुढे इंजिनीयरिंगचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांना गुजरातमध्ये नोकरी मिळाली आणि त्यानंतर 1976 मध्ये सिंचन विभागात त्यांना इंजिनीयर पदावर नोकरी मिळाली.
Pune learned engineer gets Rs 3.30 crore job at Google
महत्त्वाच्या बातम्या
- दिल्लीमध्ये संतापजनक घटना , एका बलात्कार पीडित महिलेचं केलं मुंडण ; तोंडाला फासल काळं
- राज्यातील १३९ नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर ; खुल्या प्रवर्गासाठी १०९ पदे राखीव
- वैद्यकीय महाविद्यालयांच्या अध्यापकांच्या मानधनात वाढ होणार
- धुळ्यात सर्वात नीचांकी तापमानाची नोंद; पारा @ २.८ अंश सेल्सिअसवर पोचला
- ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचे पुण्यामध्ये निधन
- महाराष्ट्राच्या समृद्ध जैवविविधतेचे देशाला दर्शन; राजपथावर चित्ररथाने अनेकांची मने जिंकली