वृत्तसंस्था
इस्लामाबाद : पाकिस्तानी पंतप्रधानाच्या विरोधात सौदी अरेबियात पाकिस्तानी नागरिकानी जोरदार निदर्शने केली. त्यांच्याविरोधात चोर-चोर म्हणून घोषणा दिल्या. पंतप्रधान शाहबाज शरीफ तीन दिवसीय सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर आहेत. काल ते आपल्या मंत्रिमंडळासह मदिनाच्या मस्जिद ए नबवीला गेले होते. पण, तिथे उपस्थित पाकिस्तानी नागरिकांनी त्यांच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. Protests in Saudi against Pakistani PM; Declaration as a thief: Anger of Pakistani citizens
पाकिस्तानी पंतप्रधान हे मस्जिद ए नबवीला पोचले. त्तिथे उपस्थित लोकांनी अचानक त्यांच्याविरोधात नारेबाजी केली. चोर-चोरचे नारेही दिले. पाकच्या माहिती मंत्री मरियम औरंगजेब यांनी या घटनेसाठी माजी पंतप्रधान इम्रान खान यांना जबाबदार धरले आहे. त्या म्हणाल्या -मला या पवित्र जागेचा वापर राजकारणासाठी करावयाचा नाही. त्यामुळे मी त्या व्यक्तीचे येथे नावही घेणार नाही. इम्रान खान यांनी पाकिस्तानी समाज उद्ध्वस्त केला आहे. माध्यमांनी या प्रकरणी काही व्यक्तींना अटक करण्यात आल्याचेही नमूद केले आहे. पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर शाहबाज यांचा हा पहिलाच सौदी दौरा आहे. या दौऱ्यात ते सौदीकडे ३.२ अब्ज डॉलर्सच्या कर्जाची मागणी करतील. त्यांच्यासोबत या दौऱ्यावर त्यांचे १६ सदस्यीय मंत्रिमंडळही आहे.
Protests in Saudi against Pakistani PM; Declaration as a thief: Anger of Pakistani citizens
महत्त्वाच्या बातम्या
- मोफत वीज देण्याच्या स्पर्धेमुळे देश वीज संकटात
- राजसभेची जोरदार तयारी : पवार – ठाकरे, गडकरी – पवार “राजकीय भेटीगाठी”…!!
- पबजी गेम खेळण्यासाठी मोबाईल हवा म्हणून केली चोरी
- Raj Thackeray : संभाजीनगरात शिवसेनेविरुद्ध तोफा धडाडणार म्हणून इम्तियाज जलील खुश; राजना इफ्तारचे निमंत्रण!!
- औरंगाबादच्या सभेस जाण्याकरिता राज ठाकरेंची जय्यत तयारी -दाैऱ्यावर जाण्यापूर्वी १०० ते १५० गुरुजी देणार शुभाशीर्वाद