विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या राजकारणात गोंधळ सुरूच आहे. एकीकडे देशाचे नवे पंतप्रधान म्हणून शाहबाज शरीफ यांच्या नावाची औपचारिक घोषणा आज होणार आहे, तर दुसरीकडे इम्रान खान यांच्या समर्थनार्थ पाकिस्तानातील अनेक शहरांमध्ये निदर्शने होत आहेत. इस्लामाबाद, कराची, पेशावर, मुलतान, क्वेटा येथे विरोधकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी होत आहे. दरम्यान, आज दुपारी २ वाजता राष्ट्रीय विधानसभेचे अधिवेशन बोलावण्यात आले आहे. Protests in Pakistan in support of Imran Khan
पाकिस्तानातील राजकीय घडामोडी आणि अविश्वास प्रस्तावावर परकीय कारस्थान असल्याचा आरोप इम्रान खान करत आहेत. यानंतर रविवारी रात्री ट्विटरवर ‘इम्पोर्टेड गव्हर्नमेंट नॉट अप्रूव्ह’ हा ट्रेंड होताना दिसला. निदर्शनादरम्यान लोक अशा प्रकारचे फलक घेऊन फिरताना दिसले.
पाकिस्तानमध्ये ‘चौकीदार चोर है’च्या घोषणा
पाकिस्तानमध्ये इम्रान यांच्या समर्थनार्थ ‘चौकीदार चोर है’च्या घोषणा देण्यात आल्या. वृत्तानुसार, पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील लाल हवेली येथे निदर्शनादरम्यान हे नारे ऐकू आले. इम्रान यांच्या समर्थकांनी लष्कराला चौकीदार संबोधले. यानंतर माजी मंत्री शेख रशीद लोकांना लष्कराच्या विरोधात घोषणा न देण्याचे आवाहन करताना दिसले.
इम्रान खान यांच्या समर्थनार्थ पाकिस्तानातील अनेक शहरांमध्ये निदर्शने सुरू आहेत. इस्लामाबाद, कराची, मुलतान, क्वेटा, पेशावरमध्ये हजारो लोक रस्त्यावर उतरून विरोधकांचा निषेध करत आहेत. या पाठिंब्याबद्दल इम्रान खान यांनी ट्विट करून जनतेचे आभार मानले आहेत. यातही त्यांनी अमेरिकेवर निशाणा साधला आहे.
तपास करणारे अधिकारी रजेवर
द ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, पीएमएल-एन नेते शाहबाज शरीफ यांच्याविरोधातील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी रजेवर गेले आहेत. शाहबाज शरीफ यांची नवे पंतप्रधान म्हणून औपचारिक घोषणा होणे बाकी असताना हे सर्व घडले आहे.
शाहबाज शरीफ यांच्या नावाची अधिकृत घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून शाहबाज शरीफ यांच्या नावाची औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. यासाठी दुपारी दोन वाजता राष्ट्रीय विधानसभेचे अधिवेशन बोलावण्यात आले आहे. येथे औपचारिक मतदान झाल्यानंतर त्यांना नवे पंतप्रधान बनवले जाऊ शकते. दुसरीकडे, शाह मेहमूद कुरेशी हे इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत.
Protests in Pakistan in support of Imran Khan
महत्त्वाच्या बातम्या
- कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणूक : ‘मोफत रेशन दिले, पण ते शिजवण्याचा सिलिंडर महाग केला’, मुख्यमंत्री ठाकरे यांचे वाढत्या महागाईवरून मोदी सरकारवर टीकास्त्र
- ‘पाकिस्तान 1947 मध्ये स्वतंत्र देश झाला, पण आज पुन्हा स्वातंत्र्यलढा सुरू झाला’, सरकार पडल्यानंतर इम्रान यांचे पहिले ट्विट
- श्रीलंकेत आर्थिक संकट गडद, 19 श्रीलंकन नागरिकांनी देश सोडून तामिळनाडू गाठले, भारताकडे मागितला आश्रय
- पीएम मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यात आज व्हर्च्युअल मीटिंग, द्विपक्षीय सहकार्य वाढविण्यावर होणार चर्चा