वृत्तसंस्था
अमृतसर : खलिस्तानी दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या कॅनडाशी भारताचे संबंध ताणले गेल्यानंतरही भारताने खलिस्तानी दहशतवाद्यांविरुद्धची कारवाई थांबवलेली नाही. कॅनडात आश्रय घेतलेल्या खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याच्या पंजाब मधल्या मालमत्ता राष्ट्रीय तपास संस्था NIA ने जप्त केल्या आहेत. यात चंदीगड आणि अमृतसरमधील मालमत्तांचा समावेश आहे. Property of Khalistani terrorist Gurpatwant Singh Pannu in Punjab seized by NIA
गुरपतवंत सिंग पन्नू हा कॅनडास्थित शीख फॉर जस्टीस (SFJ) या प्रतिबंधित संघटनेचा प्रमुख आहे. तो कॅनडा आणि इतर देशांना भारतविरोधी वक्तव्ये करत असतो. नुकत्याच झालेल्या कॅनडा-भारत वादात त्यांने कॅनडात राहणाऱ्या हिंदूंनाही धमकावले होते.
पन्नू आता या मालमत्तांचा मालक नाहीत
एनआयएने अमृतसरच्या खानकोट गावात पन्नूची 46 कनालची मालमत्ता जप्त केली आहे. खानकोट हे पन्नूचे वडिलोपार्जित गाव आहे. इथे शेतजमीन आहे. पन्नूचे घर चंदीगडच्या सेक्टर 15 सी मध्ये आहे. ते 2020 च्या आधी जप्त करण्यात आले होते. आता एनआयएने ही मालमत्ता ताब्यात घेतली आहे. कायदेशीररित्या, पन्नू आता या मालमत्तांचा मालक नाही. ही मालमत्ता आता सरकारची आहे.
दहशतवादी पन्नूचे घर क्रमांक 2033 हे चंदीगडमधील सेक्टर 15 सी येथे आहे. ते NIA ने जप्त केले आहे.
2020 मध्ये दहशतवादी घोषित
2019 मध्ये, भारत सरकारने पन्नूची संघटना SFJ वर बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा म्हणजेच UAPA अंतर्गत दहशतवादी कारवाया केल्याच्या आरोपाखाली बंदी घातली. गृह मंत्रालयाने अधिसूचनेत म्हटले होते की, शीखांसाठी सार्वमताच्या नावाखाली SFJ पंजाबमध्ये फुटीरतावादी विचारसरणीला पाठिंबा देत आहे.
2020 मध्ये, पन्नूवर फुटीरतावादाला प्रोत्साहन देण्याचा आणि पंजाबी शीख तरुणांना सशस्त्र कारवाईस चिथावणी दिल्याचा आरोप होता. यानंतर 1 जुलै 2020 रोजी केंद्र सरकारने पन्नूला UAPA अंतर्गत दहशतवादी घोषित केले. 2020 मध्ये, सरकारने SFJ शी संबंधित 40 हून अधिक वेबपेज आणि YouTube चॅनेलवर बंदी घातली.
Property of Khalistani terrorist Gurpatwant Singh Pannu in Punjab seized by NIA
महत्वाच्या बातम्या
- नागपुरात ढगफुटीसदृश पाऊस, शाळांना सुटी जाहीर; अंबाझरीसह गोरेवाडा तलाव ओव्हरफ्लो झाल्याने घरांमध्ये शिरले पाणी
- JDS एनडीएत सहभागी; अमित शहांना भेटल्यानंतर कुमारस्वामींची घोषणा, म्हणाले- आमची कोणतीही मागणी नाही
- लालू, राबडी, तेजस्वीसह 17 जणांना समन्स; लँड फॉर जॉब्स प्रकरणात 4 ऑक्टोबरला हजर राहावे लागणार
- बिधूडीने फिजूल हुसका दी है मक्खी; उत्तर प्रदेशच्या राजकारणात बसपाला ढकलले I.N.D.I आघाडीत!!