• Download App
    नागपूरात पुरातून 400 लोक सुरक्षित बाहेर; देवेंद्र फडणवीसांची माहिती; आज सायंकाळी नागपूर दौरा 400 people safe from floods in Nagpur

    नागपूरात पुरातून 400 लोक सुरक्षित बाहेर; देवेंद्र फडणवीसांची माहिती; आज सायंकाळी नागपूर दौरा

    प्रतिनिधी

    नागपूर : नागपूर येथे काल मध्यरात्री कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि त्यानंतर प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे माध्यमांशी संवाद साधला. 400 people safe from floods in Nagpur

    त्यावेळी त्यांनी दिलेली माहिती अशी :

    • काल मध्यरात्री 2 ते पहाटे 5 पर्यंत मुसळधार पाऊस झाला. एकूण पाऊस हा 109 मि.मी. पेक्षा अधिक होता. त्यातही अवघ्या दोन तासात 90 मि.मी. पाऊस झाला.
    • पहाटेपासून मी स्वत: संपर्कात होतो. विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी अशी संपूर्ण टीम लगेच सज्ज झाली आणि त्यांनी प्रत्यक्ष प्रभावित भागात जाऊन स्थितीची माहिती घेतली, मदतकार्यासाठी सूचना दिल्या.
    • एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या प्रत्येकी 2 तर लष्कराच्या दोन चमू तातडीने तैनात करण्यात आल्या. लष्कराची एक चमू वापरण्यात आली. तथापि सध्या दोन्ही चमू आपातकालीन स्थिती उदभवली, तर सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
    • आतापर्यंत 400 हून अधिक नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. मूक-बधीर विद्यालयातील 70 विद्यार्थी, एलएडी कॉलेजमधील 50 विद्यार्थिनींनाही सुखरूप बाहेर काढण्यात आले.
    • आता पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. या पावसाने अंबाझरी, शंकरनगर, हजारीपहाड, नंदनवन, नागनदीला लागून असलेला परिसर प्रभावित झाला.
      ऑरेंज अलर्ट असल्याने शाळा-महाविद्यालयांना सुटी देण्यात आली.
    • ज्यांना बाहेर सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले, त्यांच्यासाठी तात्पुरते निवारे, जेवण इत्यादींची व्यवस्था करण्यात आली.
    • या पावसात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. एकूण 14 जनावरे सुद्धा मृत्यूमुखी पडली.
    • झालेल्या नुकसानीच्या सर्वेक्षणाचे आदेश तातडीने देण्यात आले असून, त्याला प्रारंभ सुद्धा करण्यात आला आहे. त्यांना नुकसानभरपाई देण्यात येईल.
    • आता परिस्थिती नियंत्रणात असून, प्रशासन पूर्णत: सज्ज आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नका.
    • भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, संदीप जोशी आणि इतरही टीम प्रत्यक्ष तेथे मदतीसाठी असून, मी स्वत: सायंकाळी नागपूर येथे जाणार आहे.

    400 people safe from floods in Nagpur

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chhatrapati Sambhaji Nagar : टीसी घ्यायला आला आणि शिक्षकालाच भोसकले, छत्रपती संभाजीनगर हादरले! अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या ताब्यात

    Sachin Ahir : एकट्याने पक्ष सोडूनही सचिन अहिर एकदम सेफ! अपात्रतेची कारवाई होणार नाही; जाणून घ्या कायदेशीर बाजू

    Chembur : चेंबूरमध्ये मोठी दुर्घटना! स्कूल बसवर मोठे झाड उन्मळून पडले, 4 विद्यार्थी जखमी; 11 वर्षीय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू