• Download App
    लखीमपूर घटनेची पुनरावृत्ती करण्याचे सीख फॉर जस्टिसचे षडयंत्र, 9 ऑक्टोबरला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथंना ड्रोन-ट्रॅक्टरने वेढा घालण्याचे फर्मान! । Pro Khalistan Group Sikh For Justice Announced Use Drones Tractor To Siege CM Yogi On October 9 like Lakhimpur Kheri Violence

    लखीमपूर घटनेची पुनरावृत्ती करण्याचे सीख फॉर जस्टिसचे षडयंत्र, 9 ऑक्टोबरला सीएम योगींना ड्रोन-ट्रॅक्टरने घेरण्याची चिथावणी

    Lakhimpur Kheri Violence : ‘लखीमपूर खेरी’मधील घटनेची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न सुरू आहेत. यावेळी लक्ष्य केंद्रीय मंत्री किंवा राज्यमंत्री नसून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार 9 ऑक्टोबर हा सीएम योगींसाठी धोकादायक ठरू शकतो. केंद्रीय सुरक्षा संस्था आणि राज्य पोलीस मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेबाबत सजग झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा वर्तुळ आणि मार्गाबाबत काही बदल केले जात आहेत. सीख फॉर जस्टिसचा संस्थापक आणि कायदेशीर सल्लागार गुरपतवंत सिंग पन्नू शेतकरी आंदोलनाच्या आडून चिथावणीखोर वक्तव्ये करत आहे. Pro Khalistan Group Sikh For Justice Announced Use Drones Tractor To Siege CM Yogi On October 9 like Lakhimpur Kheri Violence


    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : ‘लखीमपूर खेरी’मधील घटनेची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न सुरू आहेत. यावेळी लक्ष्य केंद्रीय मंत्री किंवा राज्यमंत्री नसून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार 9 ऑक्टोबर हा सीएम योगींसाठी धोकादायक ठरू शकतो. केंद्रीय सुरक्षा संस्था आणि राज्य पोलीस मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेबाबत सजग झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा वर्तुळ आणि मार्गाबाबत काही बदल केले जात आहेत. सीख फॉर जस्टिसचा संस्थापक आणि कायदेशीर सल्लागार गुरपतवंत सिंग पन्नू शेतकरी आंदोलनाच्या आडून चिथावणीखोर वक्तव्ये करत आहे.

    यावेळी गुरपतवंत पन्नूने 9 ऑक्टोबर रोजी ‘लखनऊ’मध्ये लखीमपूर खीरीसारखा घटना घडवण्याचे म्हटले आहे. पन्नूने शेतकऱ्यांना एक संदेश पाठवला आहे की, त्यांनी ड्रोन, ट्रॅक्टर आणि इतर वाहनांच्या मदतीने मुख्यमंत्री ‘योगी’ यांना घेराव घालावा. पन्नूने लखीमपूर खेरीमध्ये मारलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना उत्तर प्रदेश सरकारने दिलेली नुकसानभरपाईची रक्कम परत करण्यास सांगितले. तो त्यांना दुप्पट रक्कम देईल, असे म्हणाला.

    मुख्यमंत्री योगींना घेरण्याचे षडयंत्र

    9 ऑक्टोबर रोजी ‘लखनऊ’मध्ये अनेक मोठ्या नेत्यांचे कार्यक्रम नियोजित आहेत. यामध्ये बसपप्रमुख मायावतींच्या रॅलीचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधीदेखील लखनऊमधून आपल्या राजकीय प्रचाराची सुरुवात करू शकतात. गुरपतवंत सिंह पन्नू गेल्या अनेक दिवसांपासून असे संदेश पाठवत आहेत. त्यांनी पत्रकारांनाही असेच संदेश पाठवले आहेत. यामध्ये असे म्हटले आहे की, पंजाब व्यतिरिक्त देशातील इतर राज्यांतील शेतकऱ्यांनी एकत्र यावे. लखीमपूर खीरीमध्ये शेतकऱ्यांचा बळी गेला आहे. 9 ऑक्टोबर रोजी सर्व शेतकऱ्यांनी संघटित होऊन लखनऊमध्ये मुख्यमंत्री योगींना घेरले पाहिजे. यासाठी पन्नूने शेतकऱ्यांना योगीला वेढण्यासाठी ड्रोनचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

    अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडामधून येत आहेत संदेश

    परदेशात बसून सीख फॉर जस्टिसच्या माध्यमातून ‘खलिस्तान’ आंदोलन चालवणारा गुरपतवंत सिंह पन्नू म्हणाला की, लखीमपूर खेरीमध्ये मारल्या गेलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनी योगी सरकारकडून कोणतीही मदत घेऊ नये. राज्य सरकारने या घटनेनंतर मृत शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना 45-45 लाख रुपये देण्याची घोषणा केली होती. पन्नूने आपल्या संदेशात म्हटले आहे, पीडित कुटुंबाने ही रक्कम घेऊ नये. त्यांना सीख फॉर जस्टिसकडून दुप्पट रक्कम दिली जाईल. सुरक्षा यंत्रणांनी हा संदेश गांभीर्याने घेतला आहे. असे संदेश अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडामधून येत आहेत. पन्नूने या वर्षी प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावरील हिंसाचारात जखमी झालेल्या आणि आंदोलनाच्या विविध टप्प्यांवर जीव गमावलेल्या शेतकऱ्यांची नावे, पत्ते आणि तपशील मागितला होता. पन्नू हा मुद्दा संयुक्त राष्ट्रांकडे नेणार असल्याचे म्हणत होता.

    पन्नूला भारतात आणणे अवघड

    केंद्रीय गृह मंत्रालयाने पन्नूचा दहशतवाद्यांच्या यादीत समावेश केला आहे. एनआयएने पंजाबमधील पन्नूची मालमत्ता जप्त केली आहे. पन्नू आता भारताचा नागरिक राहिलेला नाही, त्यामुळे तपास यंत्रणा त्याच्यावर कारवाई करण्यास असमर्थ आहेत. एनआयएचे वरिष्ठ अधिकारी म्हणतात, सध्या पन्नू भारताचा नागरिक नाही. यामुळे तपास यंत्रणा त्याच्यावर कारवाई करण्यास सक्षम नाहीत. जिथून पन्नू फोन करतो तेथे अशा गोष्टी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कक्षेत येतात. जर तेथील पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली तर तो मानवाधिकार उल्लंघनाच्या श्रेणीत येईल. एनआयएच्या एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, गुरपतवंत सिंह पन्नूला भारतात आणणे खूप कठीण आहे. तिथले कायदे अशी सूट देत नाहीत. दहशतवादी गुरपतवंत सिंगकडे परदेशी नागरिकत्व आहे. त्याच्याविरुद्धच्या कारवाईतील हा सर्वात मोठा अडथळा बनला आहे. एनआयएच्या तपासाव्यतिरिक्त पन्नूविरुद्ध पंजाब आणि हरियाणामध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत.

    Pro Khalistan Group Sikh For Justice Announced Use Drones Tractor To Siege CM Yogi On October 9 like Lakhimpur Kheri Violence

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    पवारांच्या माढा मोहिमेनंतर फडणवीसांची स्वारी; फेरमांडणी करून “मोदी है तो मुमकिन है” ची कसून पूर्वतयारी!!

    हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या मार्क-2 क्षेपणास्त्राचा संरक्षण ताफ्यात समावेश

    कुकी दहशतवद्यांना मणिपूरमध्ये CRPF कॅम्पला केले लक्ष्य ; बॉम्ब फेकले, दोन जवान शहीद