प्रतिनिधी
नवी दिल्ली – काँग्रेसचे माजी अध्यक्ष वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी काल केंद्रातल्या मोदी सरकारला GDP वरून घेरल्यानंतर आज काँग्रेसच्या सरचिटणीस आणि उत्तर प्रदेश प्रभारी प्रियांका गांधी यांनी मोदी सरकारला दुहेरी विकासाच्या मुद्द्यावर घेरले आहे.priyanka gandhi targets modi govt over price hike of gas and other commodities
मोदींच्या अब्जाधीश मित्रांच्या संपत्तीत वाढ आणि सामान्यांना महागाईचा मार असला विकास देशाला नकोय, असे ट्विट प्रियांका गांधी यांनी करून मोदी सरकारला घेरले आहे.
एकीकडे आपल्या अब्जाधीश मित्रांच्या संपत्तीत वाढ होत आहे
तर दुसरीकडे सामान्यांसाठी अत्यावश्यक असणाऱ्या एलपीजी इंधन आणि पेट्रोल-डिझेलच्या भावात वाढ होत आहे. हाच भाजपचा विकास असून आता या विकासाला माघारी पाठवण्याची गरज आहे, असे प्रियांका गांधी यांनी ट्विटमध्ये एक ग्राफ मांडून म्हटले आहे.
या ट्विटमध्ये प्रियांका गांधी म्हणतात, की मोदीजी, आपल्या राज्यात दोन प्रकारचाच विकास होतोय. एकीकडे आपल्या अब्जाधीश मित्रांच्या संपत्तीत वाढ होतेय, तर दुसरीकडे सामान्य जनतेला आवश्यक असलेल्या वस्तूंच्या महागाईमध्ये वाढ होतेय.
जर हाच ‘विकास’ असेल तर या ‘विकासा’ला आता सुट्टी देण्याची गरज आहे.”प्रियांका गांधी यांनी या दुहेरी विकासावर टीका करून राहुल गांधी यांच्या पाठोपाठ नव्या वादाला तोंड फोडले आहे.
priyanka gandhi targets modi govt over price hike of gas and other commodities
महत्त्वाच्या बातम्या
- अनिल देशमुखांचे जावई गौरव चतुर्वेदी आणि वकील सीबीआयच्या ताब्यात!!
- राज्यात एमबीबीएस, एमडीच्या जागा वाढणार, सार्वजनिक खासगी गुंतवणुकीद्धारे नवीन वैद्यकीय महाविद्यालये, अतिविशेषोपचार रुग्णालये स्थापन करणार
- मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजेंसह सर्वपक्षीय शिष्टमंडळ गुरूवारी घेणार राष्ट्रपतींची भेट
- ग्लोबल जिहाद – इस्लामच्या शत्रुंपासून काश्मीर सोडवा