• Download App
    हिंदू विरुद्ध हिंदुत्ववादी वादात प्रियांका गांधींचीही उडी; म्हणाल्या, राहुलजी हिंदुंचा खरा अर्थ समजवताहेत!! |Priyanka Gandhi support Rahul Gandhi over his Hindutva remarks

    हिंदू विरुद्ध हिंदुत्ववादी वादात प्रियांका गांधींचीही उडी; म्हणाल्या, राहुलजी हिंदुंचा खरा अर्थ समजवताहेत!!

    वृत्तसंस्था

    रायबरेली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि केरळ मधल्या वायनाडचे खासदार राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आपले लक्ष सध्या उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघ आणि रायबरेली मतदारसंघावर केंद्रीत केले आहे. हे दोन्ही मतदारसंघ गांधी परिवाराचे पारंपारिक मतदारसंघ आहेत. राहुल गांधी २०१९ मध्ये तेथून हरले होते.Priyanka Gandhi support Rahul Gandhi over his Hindutva remarks

    कालच राहुल गांधी यांनी अमेठी मतदारसंघाचा दौरा करून तिथल्या कार्यक्रमांमध्ये हिंदू आणि हिंदुत्ववाद या विषयावर तपशीलवार भाषण केले. हिंदू म्हणजे प्रामाणिक. हिंदू म्हणजे धैर्यवान. महात्मा गांधी हे सर्वोत्तम हिंदू होते, तर नथुराम गोडसे हा हिंदुत्ववादी होता, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा काल केले होते.



    आज हिंदू विरुद्ध हिंदुत्ववादी या वादामध्ये प्रियांका गांधी यांनी उडी घेतली आहे. राहुलजी हे जनतेला हिंदू आणि हिंदूत्व यामधला भेद आणि अंतर समजावत आहेत. हिंदू म्हणजे प्रामाणिक. सर्व धर्मांविषयी आदर असलेली व्यक्ती. निर्भय व्यक्ती. कोणत्याही संकटाला निर्भयपणे तोंड देऊन त्यावर मात करणारी व्यक्ती म्हणजे हिंदू, असे राहुलजी संपूर्ण समाजाला समजावत आहेत,

    तर हिंदुत्ववादी म्हणजे डरपोक. फक्त सत्तेसाठी हपापलेला. कायम सत्याऐवजी सत्तेचा शोध घेणारा, असे राहुल जी जे म्हणत आहेत ते अतिशय योग्य आहे, अशा शब्दांमध्ये प्रियांका गांधी यांनी राहुल गांधी यांचे समर्थन केले आहे.

    हे दोघेही बहिण-भाऊ सध्या उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या गमावलेला पाया पुन्हा जुळवून काढून काढून संघटनात्मक मजबुती देण्याचे प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी हिंदू आणि हिंदुत्ववादी या विषयावरचे हा विषय नव्याने राजकीय पटलावर आणण्याचा प्रयत्न केला आहे.

    गेल्या तीन भाषणांमध्ये त्यांनी वारंवार महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे यांचे उल्लेख खरा हिंदू आणि हिंदुत्ववादी यातला भेद कसा असतो हे समजवण्यासाठी केला आहे. अर्थात त्यांच्या या वक्तव्यावर हिंदुत्ववादी पक्ष भाजप आणि शिवसेना यांनी टीकास्त्र देखील सोडले आहे.

    परंतु आज प्रियांका गांधी यांनी हिंदू विरुद्ध हिंदुत्ववादी या वादात उडी घेऊन त्याला नवा आयाम दिला आहे आता प्रियांका गांधी यांच्या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    Priyanka Gandhi support Rahul Gandhi over his Hindutva remarks

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य