Tuesday, 13 May 2025
  • Download App
    डिझेल-पेट्रोलच्या किंमती कमी करण्यावर प्रियंका गांधी म्हणाल्या - हा निर्णय मनापासून नाही, तर भीतीने घेतलाय । priyanka gandhi has taken a jibe at the narendra modi government for reducing the price of petrol and diesel

    डिझेल-पेट्रोलच्या किंमती कमी करण्यावर प्रियंका गांधी म्हणाल्या – हा निर्णय मनापासून नाही, तर भीतीने घेतलाय

    केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने दिवाळीच्या मुहूर्तावर पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींपासून देशवासीयांना दिलासा दिला आहे. सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात (एक्साईज ड्युटी) पाच रुपयांनी, तर डिझेलवर १० रुपयांची कपात केली आहे. कमी झालेले दर आजपासून लागू होतील. दुसरीकडे सरकारच्या या निर्णयावर प्रियांका गांधी यांनी मोदी सरकारला टोला लगावला आहे. भीतीपोटी सरकारने भाव कमी केल्याचे त्यांनी म्हटले आहे. priyanka gandhi has taken a jibe at the narendra modi government for reducing the price of petrol and diesel


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने दिवाळीच्या मुहूर्तावर पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींपासून देशवासीयांना दिलासा दिला आहे. सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात (एक्साईज ड्युटी) पाच रुपयांनी, तर डिझेलवर १० रुपयांची कपात केली आहे. कमी झालेले दर आजपासून लागू होतील. दुसरीकडे सरकारच्या या निर्णयावर प्रियांका गांधी यांनी मोदी सरकारला टोला लगावला आहे. भीतीपोटी सरकारने भाव कमी केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

    निर्णय मनापासून नव्हे तर भीतीने घेतला आहे

    काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी ट्विट केले आहे की, “हा मनापासून नव्हे तर भीतीने घेतलेला निर्णय आहे. वसुली म्हणजे येत्या निवडणुकीत सरकारच्या लुटीला उत्तर देण्यासाठी आहे.” महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून प्रियांका गांधी सातत्याने हल्लाबोल करत आहेत. पेट्रोलच्या दरात कपात केल्यावरही त्यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.



    या राज्यांनीही किमती कमी केल्या

    केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केल्यानंतर अनेक भाजपशासित राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे. यामध्ये उत्तर प्रदेश, मणिपूर, गोवा, उत्तराखंड, कर्नाटक, आसाम आणि त्रिपुरा या राज्यांचा समावेश आहे. येथे डिझेलचे दर 1 रुपयापर्यंत कमी झाले आहेत.

    यूपीमध्ये पेट्रोल आणि डिझेल 12 रुपयांनी स्वस्त

    केंद्राने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारनेही पेट्रोलवरील व्हॅटमध्ये 7 रुपये आणि डिझेलवर 2 रुपयांची कपात केली आहे. अशाप्रकारे आता उत्तर प्रदेशमध्ये पेट्रोल आणि डिझेल दोन्ही 12-12 रुपयांनी स्वस्त झाले आहेत.

    priyanka gandhi has taken a jibe at the narendra modi government for reducing the price of petrol and diesel

    Related posts

    IPL 2025 : आयपीएल २०२५चे नवीन वेळापत्रक जाहीर, १७ मे पासून सामना सुरू होणार

    Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीर, पंजाब आणि राजस्थानात पुन्हा ड्रोन दिसले; होशियारपूरमध्ये 5-7 स्फोट, ब्लॅकआऊट

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!