• Download App
    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘जग’ जिंकले!, भारतासाठी ऐतिहासिक सुवर्ण दिन… -एकनाथ शिंदे Prime Minister Narendra Modi won the World a historic golden day for India Eknath Shinde

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘जग’ जिंकले!, भारतासाठी ऐतिहासिक सुवर्ण दिन… -एकनाथ शिंदे

    हे देशाच्या इतिहासातले सोनेरी पान आहे,  असंही म्हणाले आहेत.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : G20 शिखर परिषद भारताच्या अध्यक्षतेखाली यशस्वी झाली आहे. भारताच्या मुत्सद्देगिरीला यश आले आणि पहिल्याच दिवशी दिल्ली जाहीरनामा यशस्वी देखील झाला. अन्यथा कोणत्याही शहरात अशी आंतरराष्ट्रीय परिषद झाली की सर्वसाधारणपणे संयुक्त वक्तव्यावर अथवा जाहीरनाम्यावर सहसा एकमत होताना दिसत नाही, पण दिल्ली जाहीरनामा भारताच्या यशस्वी मुत्सद्देगिरीमुळे परिषदेच्या पहिल्याच दिवशी मंजूर झाला. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे  कौतुक  केले आहे. Prime Minister Narendra Modi won the World a historic golden day for India Eknath Shinde

    एकनाथ शिंदे म्हणाले, ”पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘जग’ जिंकले! भारतासाठी ऐतिहासिक सुवर्ण दिन. G-२० परिषदेच्या निमित्ताने जगाच्या विविध देशांचे प्रमुख शनिवारी राजधानी दिल्लीमध्ये अवतरले, हा एक सुवर्ण दिन होता. देशाचे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची किर्ती जगभर पोहोचवली, देशाला महासत्ता बनविण्यासाठी ते अविरत परिश्रम घेत आहेत. त्याचेच एक सकारात्मक चित्र संपूर्ण देशाने पाहिले.”

    याशिवाय ”अमेरिका, ब्रिटन, जपान, जर्मनी, फ्रान्स, कॅनडा, युएई , सह अनेक बलाढ्य राष्ट्रांचे प्रमुख दिल्लीत आले. एकमताने आणि एक भावनेने एकत्र येऊन अधिक समृद्ध आणि सुसंवादी भविष्यासाठी काम करण्याचे वचन पंतप्रधानांनी यावेळी दिले. या शिखर परिषदेत पंतप्रधानांनी मांडलेला ‘दिल्ली जाहीरनामा’ एकमताने स्वीकारण्यात आला. जी-२० समूहाने टाळ्या आणि बाकं वाजवून त्याचे स्वागत केले. हे आपले मोठे राजनैतिक यश आहे.” असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

    याचबरोबर ‘वसुधैव कुटुंबकम’ ही संकल्पना घेऊन भारताने जी-२० परिषदेचे यजमानपद स्वीकारले आणि यशस्वी आयोजनही केले. या राष्ट्रगटाच्या अध्यक्षपदाचा सन्मान पंतप्रधान श्री. मोदीजींच्या रूपाने भारताला प्रथमच मिळाला, ही देशवासियांसाठी अतिशय गर्वाची गोष्ट आहे. या शिखर परिषदेच्या निमित्ताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ‘भारत’ यांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले. हे देशाच्या इतिहासातले सोनेरी पान आहे. जगभरात मोदींनी ‘जागतिक स्तरावरचा नेता’ अशी निर्माण झालेली प्रतिमा भारतासाठी निश्चितच अभिमानास्पद आहे. असंही एकनाथ शिंदे यांनी  म्हटलं आहे.

    Prime Minister Narendra Modi won the World a historic golden day for India Eknath Shinde

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Karachi port : कराची बंदरावर हल्ला करण्यासाठी भारतीय नौदल होते सज्ज

    ‘सर्व भारतीय वैमानिक परतले आहेत’, ऑपरेशन सिंदूरवर एअर मार्शलचे मोठे विधान

    इंदिरा गांधींची आठवण काढून काँग्रेसने मोदींना टोचले; पण शशी थरूर + चिदंबरम यांनी मोदींच्या निर्णयाला वाखाणले!!