वृत्तसंस्था
नवी दिल्ली : महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल. विठ्ठलाच्या आषाढी एकादशीची पंढरपूरची यात्रा म्हणजे महाराष्ट्राचा मानबिंदू. या पंढरपूर यात्रेत संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्यासह अनेक संतांच्या पालख्या पोहोचतात. यापैकी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गांचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. त्याचा शिलान्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या व्हिडिओ कॉन्फरन्स होणार आहे.Prime Minister Narendra Modi will lay foundation stone of four laning of five sections of Sant Dnyaneshawar Maharaj Palkhi Marg
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग चार लेनचा असेल, तर संत तुकाराम महाराज पालखी मार्ग तीन लेनचा असेल. सुमारे 223 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग येत्या दीड वर्षात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. यासाठी सुमारे ११०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती देखील गडकरी यांनी दिली आहे.
महाराष्ट्रातले कोट्यवधी वारकरी पालखी मार्गाच्या विस्ताराची वाट पाहत होते. आता या विस्ताराचा मार्ग मोकळा झाला असून उद्या पंतप्रधानांच्या हस्ते शिलान्यास झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला वेग येऊन ते दीड वर्षात पूर्ण होणे अपेक्षित आहे.
या मार्गांवर वारकऱ्यांच्या सोयीसाठी विविध सुविधा तयार करण्यात येत आहेत. तसेच मोठ्या प्रमाणावर देशी वृक्षांची लागवड करुन पालख्यांच्या पारंपरिक विसाव्याच्या आणि मुक्कामाच्या ठिकाणी विविध सोयी करण्यात येणार आहेत.
Prime Minister Narendra Modi will lay foundation stone of four laning of five sections of Sant Dnyaneshawar Maharaj Palkhi Marg
महत्त्वाच्या बातम्या
- गडबड चीज पीएंगे तो ऐसाही होगा, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार दारूबंदी निर्णयावर ठाम
- खलिस्तानवाद्यांचा आता थेट कॅनडात जाऊन शोध, शेतकरी आंदोलनात सहभागाचा संशय
- केंद्राने केले आता तुम्हीही करा, इंधनावरील १२ रुपये नफा कमी करून सवलत द्या, नवनीत राणा यांची मागणी
- शरद पवार कधीपासून सरकारची भूमिका मांडायला लागले? चद्रकांत पाटील यांचा सवाल
- मुकेश अंबानी भारतातच राहणार, लंडनला स्थाईक होणार असल्याच्या अफवाच