ईशान्येत मोदींनी दाखवली जादू- लोककलाकार ढोल वाजवत होते आणि पंतप्रधान स्वत:ला थांबवू शकले नाहीत …
विशेष प्रतिनिधी
मणिपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी मणिपूर आणि त्रिपुरामध्ये पोहोचले. त्यांनी 4800 कोटींचा प्रकल्प सुरू केला. मोदी त्रिपुरात पोहोचले तेव्हा त्यांची क्रेझ इथे पहायला मिळाली .आगरतळा येथील स्वामी विवेकानंद मैदानावर मोदींना पाहण्यासाठी अलोट गर्दी झाली होती. महिला त्यांच्या पोस्टरसोबत सेल्फी घेताना दिसल्या.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनेक वेगवेगळ्या शैली तुम्ही आतापर्यंत पाहिल्या असतील. पीएम मोदी दररोज चर्चेत असतात. कधी ते बागेत योगा करताना तर कधी जिममध्ये व्यायाम करताना दिसतात. आता पीएम मोदी ढोल वाजवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मोदींच्या स्वागतासाठी त्रिपुराचे लोककलाकार उपस्थित होते. त्यांना पाहून पंतप्रधान थांबले. एक कलाकार पारंपरिक घंटा घेऊन उभा होता, मोदींनी या वाद्यावरही हात आजमावला.
पुढे गेले तर एक कलाकार ढोलकी वाजवत होते . त्यांना पाहताच मोदी स्वत:ला रोखू शकले नाहीत आणि त्यांनीच ढोल वाजवण्यास सुरुवात केली. काही वेळ ढोल वाजवल्यानंतर मोदींनी कलाकारांना अभिवादन केले आणि तेथून निघून गेले.
मोदी म्हणाले- HIRA बनेल त्रिपुराच्या विकासाचे मॉडेल
मोदींनी आगरतळा येथील महाराजा बीर बिक्रम विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन केले. 3400 कोटी रुपये खर्चून ते बांधण्यात आले आहे. याशिवाय त्यांनी मुख्यमंत्री त्रिपुरा ग्राम समृद्धी योजना आणि 100 विद्याज्योती शाळांच्या प्रकल्पाचा शुभारंभ केला.
स्वामी विवेकानंद मैदानावर झालेल्या सभेत मोदी म्हणाले की, यापूर्वीच्या सरकारांकडे या राज्यासाठी दूरदृष्टी नव्हती. मी खात्री देतो की HIRA म्हणजेच महामार्ग, इंटरनेट, रेल्वे आणि विमानतळ हे त्रिपुराच्या विकासाचे मॉडेल बनतील. त्रिपुराला ईशान्येचे प्रवेशद्वार बनवण्याचे काम सुरू आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे 4800 कोटी रुपयांच्या 22 विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.
सुमारे 1850 कोटी रुपये खर्चाच्या 13 प्रकल्पांचे उद्घाटन आणि सुमारे 2950 कोटी रुपये खर्चाच्या नऊ प्रकल्पांची पायाभरणीही त्यांनी केली.
हे प्रकल्प रस्ते बांधकाम, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, आरोग्य, शहरी विकास, गृहनिर्माण, माहिती तंत्रज्ञान, कौशल्य विकास, कला आणि संस्कृती यासारख्या विविध क्षेत्रांशी संबंधित आहेत.
यासह, प्रदेशात चांगली कनेक्टिव्हिटी पुनर्संचयित करण्यासाठी पंतप्रधानांनी पाच राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या बांधकामाची पायाभरणी केली. त्याच बरोबर, पंतप्रधानांनी बराक नदीवरील पोलादी पुलाचे उदघाटन केले ज्यामुळे वर्षभर इम्फाळ ते सिलचर पर्यंत अखंड संपर्क राहिल. त्यांनी 2,387 मोबाईल टॉवर्सचे उद्घाटनही केले.
Prime Minister Narendra Modi plays traditional musical instruments during his visit to Manipur
महत्त्वाच्या बातम्या
- अमेरिकेत कोरोनाची त्सुनामी, एकाच दिवसात दहा लाख बाधित
- त्यांचे पूर्वज म्हणालयचे आम्ही अॅक्सीडेंटल हिंदू, योगी आदित्यनाथ यांचा राहूल गांंधींवर निशाणा
- गडकरी प्रेमाची राजकीय बौद्धिक दिवाळखोरी!!
- भाऊरायांची भाजपमध्ये जाण्याची चर्चा, ममता बॅनर्जींनी वहिनीसाहेबांना आणले राजकारणात
- डिजीटल इंडियाचे पंतप्रधानांचे स्वप्न साकार ,अर्थव्यवहारांसाठी यूपीआयचा पर्याय, ४५६ कोटी व्यवहारांची वर्षात नोंद