• Download App
    आयएनएस विशाखापट्टणममुळे संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर पाऊल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले कौतुक|Prime Minister Narendra Modi lauded INS Visakhapatnam, step towards Aatmnirbhar Bharat

    आयएनएस विशाखापट्टणममुळे संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर पाऊल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले कौतुक

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारतीय नौदलाने रविवारी भारतातील पहिले स्वदेशी बनावटीचे, स्टिल्थ गाईडेड-क्षेपणास्त्र नाशक आयएनएस विशाखापट्टणम े कार्यान्वित केल्यामुळे, देशाच्या संरक्षण व्यवस्थेला बळकटी मिळाली आहे. संरक्षण क्षेत्रात भारताचे आत्मनिर्भर पाऊल पडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर’ होण्याच्या प्रयत्नांना पुढे नेल्याबद्दल संरक्षण युनिटचे कौतुक केले.Prime Minister Narendra Modi lauded INS Visakhapatnam, step towards Aatmnirbhar Bharat

    पंतप्रधानांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, हे जहाज उच्च तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. आयएनएस विशाखापट्टणम देशाच्या सुरक्षा यंत्रणेला बळकट करेल. भारत संरक्षण व्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्याच्या प्रयत्नांवर काम करत राहील.



    ‘विशाखापट्टणम’ नावाच्या या जहाजाचे बांधकाम आणि वितरण हे स्वदेशी युद्धनौका बांधण्याच्या कार्यक्रमांच्या दृष्टीने सरकार आणि नौदलासाठी एक मैलाचं पाऊल आहे. विशाखापट्टणम नौदलात सामील झाल्यामुळे, प्रगत युद्धनौका डिझाइन आणि तयार करण्याची क्षमता असलेला देश म्हणून भारताची जगभरात ओळख झाली आहे.

    ही नाशक युद्धनौका पूर्णपणे स्वदेशी आहे. ऑक्टोबर 2013 मध्ये या युद्धनौकेचे बांधकाम सुरू झाले. या युद्धनौकेचे वजन 7400 टन आहे. विशाखापट्टणमची एकूण लांबी ट्रेनच्या 7 डब्यांच्या लांबीइतकी 535 फूट आहे.

    भारतीय नौदलाच्या या पहिल्या स्टेल्थ गाईडेड मिसाईल नाशक युद्धनौकेमध्ये भारताची सर्वात शक्तिशाली क्षेपणास्त्र यंत्रणा बसवण्यात आली आहे. यामध्ये ब्रह्मोस आणि बराक क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. शत्रूचे जहाज पाहताच आयएनएस विशाखापट्टणम विमानविरोधी क्षेपणास्त्रे डागून शत्रूचा नाश करू शकते.

    विशाखापट्टणमचा कमाल वेग ताशी 56 किलोमीटर आहे. युद्धनौका ताशी 26 किमी वेगाने धावत असताना त्याची श्रेणी 7400 किमी आहे. या विनाशकारी युद्धनौकेवर नौदलाचे 300 जवान एकत्र राहू शकतात. याशिवाय या युद्धनौकेवर 32 अँटी एअर बराक क्षेपणास्त्रे तैनात केली जाऊ शकतात. ही क्षेपणास्त्रे 100 किमीपर्यंत मारा करण्यास सक्षम आहेत.

    या युद्धनौकेवर 16 अँटी-शिप किंवा लँड अ‍ॅटॅक ब्रह्मोस क्षेपणास्त्रे तैनात केली जाऊ शकतात. यात 76 मिमीची ओटीओ मेराला तोफ, 4 एके-603 सीआयडब्ल्यूएस तोफा देखील आहेत, ज्यामुळे शत्रूची जहाजे, क्षेपणास्त्रे डोळ्याच्या झटक्यात नष्ट करता येतात. हे 4 टॉपेर्डो ट्यूब, 2 फइव-6000 अँटी-सबमरीन रॉकेट लाँचर्सने सुसज्ज आहे.

    Prime Minister Narendra Modi lauded INS Visakhapatnam, step towards Aatmnirbhar Bharat

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका