• Download App
    गुजरात मधील मोरबीच्या दुर्घटनाग्रस्त पूलाची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून पाहणी Prime Minister Narendra Modi inspects the collapsed bridge at Morbi in Gujarat

    गुजरात मधील मोरबीच्या दुर्घटनाग्रस्त पूलाची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून पाहणी

    वृत्तसंस्था

    मोरबी : गुजरात मधील मोरबी येथे पूल दुर्घटनेत मृतांची संख्या 135 झाली आहे आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोरोबीच्या दुर्घटनाग्रस्त पुलाजवळ पाहून जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. तेथे अजूनही मृतदेहांचा शोध सुरू आहे. एनडीआरएफच्या टीम तिथे कार्यरत आहेत. Prime Minister Narendra Modi inspects the collapsed bridge at Morbi in Gujarat

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि गृहमंत्री हर्ष सिंघवी यांच्यासह घटनास्थळावर जाऊन पाहणी केली आहे. पंतप्रधान मोदींचा मोरबी दौरा केवळ इव्हेंट असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. मोदी प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट देणार आणि हॉस्पिटलला भेट देणार हे लक्षात घेऊन तेथे गुजरात सरकारने डागडुजी केली आहे, असा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे. हॉस्पिटलमध्ये ठिकठिकाणी वेगवेगळ्या व्यवस्था केल्या. या डागडुजीचे काम आम आदमी पार्टीच्या उमेदवाराने प्रत्यक्ष तिथे जाऊन बंद पाडले.

    मोरबीच्या दुर्घटनेसाठी जबाबदार असलेल्या 9 लोकांना गुजरात पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. मात्र, यामध्ये ओरेवा कंपनीच्या अधिकाऱ्यांना वगळले असून केवळ क्लार्क आणि प्रत्यक्ष तिथे काम करणाऱ्या लोकांनाच अटक केल्याचे आरोप विरोधी पक्षांनी केले आहेत. या पार्श्वभूमीवर मोदींचा प्रत्यक्ष घटनास्थळाचा आणि हॉस्पिटलचा दौरा महत्त्वाचा मानला जातो आहे.

    Prime Minister Narendra Modi inspects the collapsed bridge at Morbi in Gujarat

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शाह यांचे शीर छाटून टेबलावर ठेवावे विधान, महुआ मोईत्रा यांच्यावर टीकेची झाेड

    Goa Chief Minister Pramod Sawant slams : सकारात्मक मुद्दे नसल्याने सभेत असभ्य भाषा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा घणाघात

    राहुल गांधी एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!!