वृत्तसंस्था
नवी दिल्ली : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली सर्वात बडी कंपनी गुगल आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आहे. भारताकडे प्रगत आणि प्रगतिशील देशांच्या गट जी 20 चे अध्यक्ष पद आले आहे. त्याचे समर्थन सुंदर पिचाई यांनी या भेटीत केले आहे Prime Minister Narendra Modi – Google CEO Sundar Pichai meeting; Support for the G20 Presidency
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतात तंत्रज्ञान वापराचा वेग वाढतो आहे. भारतात तंत्रज्ञान परिवर्तनाचे उत्तम परिणाम पाहताना आनंद होतो आहे. यामुळे गुगल आणि भारत यांच्यातील यांच्यातील सहकार्य अधिक दृढ होणार आहे. ओपन आणि कनेक्टेड इंटरनेट सुविधा भारतात जास्तीत जास्त सुदूर पोहोचवण्याच्या दृष्टीने गुगल भारताच्या जी 20 अध्यक्ष पदाचे समर्थन करते, असे ट्विट सुंदर पिचाई यांनी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर केले आहे.
तत्पूर्वी सुंदर पिचाई यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात जाऊन भेट घेतली. त्यावेळी द्रौपदी मुर्मू यांनी सुंदर पिचाई यांचे वर्णन भारताच्या विद्वत्तेचे आणि गुणवत्तेचे प्रतीक अशा शब्दांत केले. भारतात डिजिटल साक्षरता वाढवण्यासाठी गुगलने जास्तीत जास्त प्रयत्न करावेत, असे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. राष्ट्रपतींच्या या आवाहनाला सुंदर पिचाई यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
Prime Minister Narendra Modi – Google CEO Sundar Pichai meeting; Support for the G20 Presidency
महत्वाच्या बातम्या
- स्वातंत्र्य काँग्रेसने आणलं, तुमच्या घरातलं कुत्र तरी मेलं का?; मल्लिकार्जुन खर्गेंची घसरली जीभ
- Fifa World Cup Final : लिओनेल मेस्सीचे स्वप्न साकार!!; ३६ वर्षांनी अर्जेंटिनाने कोरले फुटबॉल वर्ल्ड कप वर नाव; फ्रान्स पराभूत
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : राष्ट्रवादीवर क्वचित वार; पण अचूक प्रहार!!
- संजय राऊतांना ‘ते’ ट्विट भोवणार; मराठा क्रांती मोर्चा गुन्हा दाखल करणार