• Download App
    गांधीमार्गावरून भरकटत असलेल्या देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा गांधीजींच्या विचाराच्या मार्गावर आणले, अमित शहा यांनी केले कौतुक|Prime Minister Narendra Modi brought the country back on the path of Gandhiji's thinking, Amit Shah lauded

    गांधीमार्गावरून भरकटत असलेल्या देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा गांधीजींच्या विचाराच्या मार्गावर आणले, अमित शहा यांनी केले कौतुक

    विशेष प्रतिनिधी

    अहमदाबाद : गांधीमार्गावरून भरकटत असलेल्या देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा गांधीजींच्या विचाराच्या मार्गावर आणले आहे. नवीन शैक्षणिक धोरणात गांधीवादी विचारांचा समावेश केला असल्याचे कौतुक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे.Prime Minister Narendra Modi brought the country back on the path of Gandhiji’s thinking, Amit Shah lauded

    अमित शाह यांनी अहमदाबादच्या पालडी भागातील कोचरब आश्रमात एका कार्यक्रमाला संबोधित केले. महात्मा गांधींच्या मीठाच्या सत्याग्रहाच्या ९२ व्या वर्धापन दिनानिमित्त दक्षिण गुजरातमधील दांडी येथे सायकल रॅलीच्या शुभारंभासाठी अमित शाह आले होते. या रॅलीअंतर्गत १२ सायकलस्वार दांडीयात्रा मार्गावरून जात असताना महात्मा गांधींचा संदेश देणार आहेत.



    यावेळी बोलताना शहा म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तसेच अनेक सरकारी प्रकल्प आणि योजनांमध्ये महात्मा गांधींच्या तत्त्वांचा समावेश केला आह. जर भारत सुरुवातीपासूनच गांधींनी दाखविलेल्या मार्गावर चालला असता, तर देशाला सध्या ज्या समस्या आहेत त्यांना तोंड द्यावे लागले नसते.

    समस्या ही आहे की आपण गांधींनी दाखवलेल्या मागार्पासून भरकटलो होतो. पंतप्रधान मोदींनी नव्या शैक्षणिक धोरणात गांधींच्या आदर्शांचा समावेश केला आहे. उदाहरणार्थ, मातृभाषा आणि राष्ट्रभाषांसोबत रोजगार शिक्षणाला महत्त्व देणे. पंतप्रधानांनी नवीन शैक्षणिक धोरणात सर्व गांधीवादी तत्त्वे अंतर्भूत केली आहेत.

    शहा म्हणाले, भारताच्या स्वातंत्र्यलढ्याशिवाय कोणत्याही देशाला सशस्त्र क्रांतीशिवाय स्वातंत्र्य मिळालेले नाही. लोकांमध्ये जागृती हेच आमचे सर्वात मोठे शस्त्र असल्याचे ते म्हणाले होते. या जाणीवेमुळे भारतावर राज्य करणे कोणत्याही देशाला अशक्य झाले. मिठाच्या सत्याग्रहादरम्यान खेडोपाडी रात्रीच्या मुक्कामात गांधींनी सर्वसामान्यांच्या समस्या ऐकून घेतल्या.

    या समस्या समजून घेतल्यानंतर त्यांनी त्यावर उपाय शोधून काढले आणि ते उपाय आपल्या भाषणातून लोकांपर्यंत पोहोचवले. पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनीही तेच केले. गावकऱ्यांच्या प्रगतीसाठी, गावांना स्वावलंबी बनवणे आणि प्रत्येक घरात वीज, पाणी आणि शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देणे या सरकारी योजना पाहिल्या तर त्यात गांधीवादी विचार आणि आदर्शांची झलक दिसेल.

    Prime Minister Narendra Modi brought the country back on the path of Gandhiji’s thinking, Amit Shah lauded

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य