• Download App
    भारताची मजबूत अर्थव्यवस्थेकडे वाटचाल, पुढील तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास|Prime Minister Narendra Modi believes that India is moving towards a stronger economy, ready to lead the next technological revolution

    भारताची मजबूत अर्थव्यवस्थेकडे वाटचाल, पुढील तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारत मजबूत अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहे. देशाचा सेमी कंडक्टरचा वापर 2030 पर्यंत 110 अब्ज अमेरिकन डॉलर ओलांडण्याची अपेक्षा आहे.जगातील सर्वात वेगाने वाढणारी स्टार्ट-अप इको-सिस्टम भारतात आहे. त्यामुळे भारत पुढील तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.Prime Minister Narendra Modi believes that India is moving towards a stronger economy, ready to lead the next technological revolution

    सेमिकॉन इंडिया-2022 परिषदेच्या उद्घाटन सत्रात बोलताना पंतप्रधान म्हणाले, भारताला पुढील तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व करण्याचा मार्ग आमचे सरकार मोकळा करत आहोत. आम्ही सहा लाख गावांना ब्रॉडबँडने जोडण्याच्या मार्गावर आहो 5 जी इंटरनेट आॅफ थिंग्ज आणि स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानामध्ये क्षमता विकसित करण्यासाठी गुंतवणूक करत आहोत.



    भारतातील सेमी कंडक्टचा वापर 2026 पर्यंत वर 80 अब्ज आणि 2030 पर्यंत 110 अब्ज अमेरिकन डॉलर ओलांडण्याची अपेक्षा आहे. सर्वात वेगाने वाढणाºया स्टार्टअप इको-सिस्टमसह मजबूत आर्थिक विकासाकडे देश वाटचाल करत आहे. भारतात दर काही आठवड्यांनी नवीन युनिकॉर्न येत आहेत. जागतिक सेमी-कंडक्टर पुरवठा साखळीतील प्रमुख भागीदारांपैकी एक म्हणून भारताचे स्थान निर्माण ह ोत आहे.

    यासाठी हाय-टेक, उच्च गुणवत्ता आणि उच्च विश्वासार्हतेच्या तत्त्वावर आधारित या दिशेने काम करण्याची गरज आहे. सेमी-कंडक्टर तंत्रज्ञानासाठी भारत हे गुंतवणुकीचे आकर्षक ठिकाण बनले आहे. आम्ही १३० कोटी भारतीयांना जोडण्यासाठी डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करत आहोत.

    आरोग्य आणि कल्याणापासून ते समावेश आणि सक्षमीकरणापर्यंत शासनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये जीवन बदलण्यासाठी देश डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. 21 व्या शतकातील गरजांसाठी भारत तरुणांना कौशल्य आणि प्रशिक्षण देण्यासाठी देश मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहे.

    Prime Minister Narendra Modi believes that India is moving towards a stronger economy, ready to lead the next technological revolution

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!