विशेष प्रतिनिधी
द्रास : वारंवार भारतात विरोधातल्या युद्धात पराभव होऊन देखील पाकिस्तान त्या पराभवातून काही शिकलाच नाही. तो देश आजही दहशतवादालाची चिथावणी देतोच आहे, पण भारत दहशतवाद पूर्ण मोडून काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा गंभीर इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिल विजय दिवशी दिला. त्याचवेळी त्यांनी सरकारने सैन्य दलातल्या सुधारणांविषयी आक्रमक भाष्य केले. भारतीय सैन्यामुळे तरुणांची भरती होण्यासाठी करण्यासाठी अग्निपथ योजनेचे त्यांनी समर्थन केले. मात्र, त्याच मुद्द्यावर विरोधकांनी सरकारवर आगपाखड केली. Prime Minister Modi’s serious warning to Pakistan on Kargil Victory Day
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने द्रास मधील युद्ध स्मारकावर जाऊन शहिदांना आदरांजली वाहिली. कारगिल युद्ध स्मारक येथे पंतप्रधान मोदी म्हणाले, “जेव्हाही पाकिस्तानने कोणतेही दुस्साहस केले तेव्हा त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यांनी इतिहासातून कोणताही धडा घेतलेला नाही”. युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्यांनी देशासाठी दिलेले बलिदान अमर आहे आणि कारगिल विजय दिवसाच्या रूपाने ते सदैव स्मरणात राहील.
मोदी म्हणाले, आम्ही फक्त कारगिलचे युद्ध जिंकले नाही. आम्ही सत्य, संयम आणि शक्तीचे अप्रतिम प्रदर्शन केले होते. भारत त्यावेळी शांततेसाठी प्रयत्न करत होता, त्या बदल्यात पाकिस्तानने पुन्हा एकदा आपला अविश्वासू चेहरा दाखवला. पण सत्यासमोर असत्याचा आणि दहशतवादाचा पराभव झाला. यापूर्वी पाकिस्तानने जितके प्रयत्न केले, त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले पण पाकिस्तानने आपल्या इतिहासातून काहीही शिकलेले नाही. दहशतवाद आणि प्रॉक्सी वॉरच्या सहाय्याने स्वतःला सुसंगत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे, पण आज जेव्हा मी अशा ठिकाणाहून बोलतोय जिथे दहशतवादाचे धनी माझा आवाज थेट ऐकू शकतात, तेव्हा मला या दहशतवादाच्या चिथावणीखोरांशी बोलायचे आहे त्यांच्या नापाक योजना भारत कधीही यशस्वी होऊ देणार नाही. आमचे शूर जवान दहशतवादाला पूर्ण ताकदीने चिरडून टाकतील. शत्रूला चोख प्रत्युत्तर देतील. लडाख असो वा जम्मू-काश्मीर, भारत आपल्या विकासासमोरील प्रत्येक आव्हानाचा पराभव करेल.
सरकारने सैन्य दलात भरपूर सुधारणा आणल्या. अग्निपथ योजनेद्वारे तरुणांची सैन्य भरती सुरू केली. संरक्षण क्षेत्रात आतापर्यंत फक्त शस्त्रांची आणि सामग्रीची आयात होत होती परंतु सरकारने या क्षेत्रातील निर्यात वाढवली ती हजारो कोटी रुपयांपर्यंत पोहोचली, याची आठवण पंतप्रधान मोदींनी करून दिली.
पण विरोधकांना मोदींचे हे भाष्य रुचले नाही. अग्निपथ योजनेवरून काँग्रेस सह सगळ्या विरोधकांनी सरकारवर आगपाखड केली. सरकार केवळ पेन्शनचा पैसा वाचवण्यासाठी अग्निपथ योजनेसारख्या किरकोळ आणि तात्पुरत्या योजनेवर भर देत असल्याची टीका माजी गृहमंत्री पी. चिदंबरम, प्रमोद तिवारी आणि बाकीच्या काँग्रेस नेत्यांनी केली.
Prime Minister Modi’s serious warning to Pakistan on Kargil Victory Day
महत्वाच्या बातम्या
- BCCI सचिव जय शहा यांची घोषणा; ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंना 8.5 कोटींची मदत, 117 भारतीय खेळाडू सहभागी होणार
- Pushkar Singh Dhami : अग्निवीरांसाठी पुष्कर सिंह धामी सरकारने केली मोठी घोषणा
- US Elections : बायडेन यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यावर ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया
- एकीकडे जरांगेंची अमित शाहांवर जहरी टीका; तर दुसरीकडे पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला!!