• Download App
    ग्लासगो परिषदेत पंतप्रधान मोदींचा जगाला पंचामृत फॉर्म्युला आणि लाईफचा मंत्र|Prime Minister Modi's Panchamrit Formula and Mantra of Life to the world at the Glasgow Summit

    ग्लासगो परिषदेत पंतप्रधान मोदींचा जगाला पंचामृत फॉर्म्युला आणि लाईफचा मंत्र

    विशेष प्रतिनिधी

    ग्लासगो: ग्लासगो येथे आयोजित वर्ल्ड लीडर समिट आॅफ कोप-२६ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंचामृत फॉमुर्ला दिला असून, लाइफचा एक मंत्रही दिला आहे. मोदी म्हणाले की, मी अशा भूमितून आलो आहे, ज्या देशाने हजारो वर्षांपूर्वी दिलेला मंत्रही आजच्या २१ व्या शतकात उपयोगी पडत आहे आणि प्रासंगिक ठरत आहे.Prime Minister Modi’s Panchamrit Formula and Mantra of Life to the world at the Glasgow Summit

    ग्लासगो समिटमध्ये पंतप्रधान मोदी पंचामृत फॉर्म्युला सांगताना म्हणाले, २०३० पर्यंत भारत आपल्या नॉन फॉसिल एनर्जी कॅपेसिटी ५०० गीगावॅटपर्यंत कमी करेल. दुसरे म्हणजे भारत सन २०३० पर्यंत ५० टक्के हरित तसेच स्वच्छ एनर्जीपर्यंत वाटा नेईल. कुल प्रोजेक्टेड कार्बन एमिशन एक बिलियन टनपर्यंत कमी करेल. चौथे म्हणजे भारत अर्थव्यवस्थेतील कार्बन इंटेन्सिटी ४५ टक्क्यांपर्यंत कमी करेल तसेच २०७० पर्यंत भारत नेट झीरोच्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल.



    भारताने जगाला नाही, तर देशावासींना वचन दिले. पॅरिस येथे झालेला हवामान बदलाचा करार ही भारतासाठी केवळ एक इव्हेंट नव्हता, तर ती कमिटमेंट होती असे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले, भारताने जगाला नाही, तर आपल्या देशवासीयांना हवामान बदलासंदभार्तील वचन दिले आहे.

    हवामान बदलाचा सर्वांत मोठा फटका शेती आणि शेतकही बांधवांना बसला आहे. विकसनशील देशांना हवामान बदलाचा मोठे नुकसान झाले असून, जागतिक स्तरावरील मागास तसेच प्रगतीत मागे असलेल्या देशांना बड्या देशांकडून मदत मिळाली पाहिजे.

    लाइफ फॉर इनव्हायरमेंट असा मंत्र या परिषदेच्या माध्यमातून जगाला देताना मोदी म्हणाले, भारताने देशातील गरजूंना मोठे लाभ मिळवून दिलेभारतात राबवण्यात आलेल्या अनेकविध योजनांच्या माध्यमातून देशातील गरीब आणि गरजू समाजाला मोठे लाभ मिळवून दिले.

    यामध्ये जल, स्वच्छ भारत मिशन आणि उज्ज्वला यांसारख्या अनेक योजनांमुळे कोट्यवधी देशवासीयांना मोठा लाभ मिळाला. इतकेच नव्हे तर समाजाभिमुख आणि अनुकूल योजना, धोरणांमुळे गरीब समाजाचा जीवनस्तरही सुधारला आहे.

    Prime Minister Modi’s Panchamrit Formula and Mantra of Life to the world at the Glasgow Summit

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Shri Siddhivinayak Temple : श्री सिद्धिविनायक मंदिरात आता नारळ, हार अन् प्रसाद बंदी

    Marco Rubio and S Jaishankar : अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी एस जयशंकर यांच्याशी केली चर्चा

    Asaduddin Owaisi : पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीला असदुद्दीन ओवैसींनी सुनावले, म्हणाले..