शिरोमणी अकाली दलाचे संस्थापक आणि पंजाबचे पाच वेळा मुख्यमंत्री राहिलेले प्रकाशसिंग बादल यांचा आज ९४वा जन्मदिवस आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी ट्विट केले की, ‘भारतातील सर्वात प्रतिष्ठित राजकारण्यांपैकी एक प्रकाशसिंग बादल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. पंजाबच्या, विशेषतः समाजातील दुर्बल घटकांच्या प्रगतीसाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. त्यांच्या दीर्घायुष्यासाठी मी प्रार्थना करतो.” Prime Minister Modi wished Prakash Singh Badal on his 94th birthday and said- He worked hard for the progress of Punjab!
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : शिरोमणी अकाली दलाचे संस्थापक आणि पंजाबचे पाच वेळा मुख्यमंत्री राहिलेले प्रकाशसिंग बादल यांचा आज ९४वा जन्मदिवस आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी ट्विट केले की, ‘भारतातील सर्वात प्रतिष्ठित राजकारण्यांपैकी एक प्रकाशसिंग बादल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. पंजाबच्या, विशेषतः समाजातील दुर्बल घटकांच्या प्रगतीसाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. त्यांच्या दीर्घायुष्यासाठी मी प्रार्थना करतो.”
पंजाबमध्ये होणाऱ्या निवडणुकीत भाजप आणि अकाली दल यांच्यात युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन पक्षांच्या मैत्रीत गेल्या अनेक वर्षांपासून दुरावा निर्माण झाला होता, जेव्हा शेतकऱ्यांनी कृषी कायद्याला विरोध करण्यास सुरुवात केली होती. मात्र, आता केंद्र सरकारने हे तीनही कृषी कायदे मागे घेतले आहेत. त्यामुळे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
प्रकाशसिंग बादल यांचा जन्म ८ डिसेंबर १९२७ रोजी झाला. त्यांनी देशाचा स्वातंत्र्यलढा आणि देशाला स्वातंत्र्य मिळताना पाहिलेले आहे. स्वातंत्र्यसंग्रामातही ते सक्रिय होते. देशाच्या स्वातंत्र्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. प्रकाशसिंग बादल हे 1957 मध्ये गिद्दरबाहा विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभेत निवडून आले होते. त्यानंतर ते राजकारणात पुढे जात राहिले. प्रकाशसिंग बादल यांची 1970 मध्ये पहिल्यांदा पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून निवड झाली. यानंतर ते 1977, 1997, 2007 आणि पुन्हा 2012 मध्ये मुख्यमंत्री म्हणून निवडून आले होते.
Prime Minister Modi wished Prakash Singh Badal on his 94th birthday and said- He worked hard for the progress of Punjab!
महत्त्वाच्या बातम्या
- ओबीसींच्या आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वच निवडणुका रद्द करा, चंद्रकांत पाटील यांची मागणी
- अफ्सा कायदा देशावर काळा डाग, सैन्याला विशेष अधिकार देणारा कायदा रद्द करण्याची नागालॅँड सरकारची मागणी
- धर्मांध राजकारणासाठी चिमुकल्यांचा वापर, आय एम बाबरी लिहिलेले बॅज विद्यार्थ्यांच्या खिशाला लावले
- पवार बनणार काँग्रेस आणि ममता यांच्यातला पूल?, की दोघांनाही देणार राजकीय हूल…??