• Download App
    पंतप्रधान मोदी आज घेणार मुख्यमंत्र्यांसोबत बैठक । Prime Minister Modi will hold a meeting with the Chief Minister today

    पंतप्रधान मोदी आज घेणार मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : देशातील कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रकरणांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेणार आहेत. पंतप्रधान मोदींनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. Prime Minister Modi will hold a meeting with the Chief Minister today

    त्यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, बुधवारी दुपारी राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार आहे. तत्पूर्वी, केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण हे या बैठकीत सादरीकरण करतील, असे पंतप्रधान कार्यालयाने सांगितले. देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग आणि मृत्यू पुन्हा वाढू लागले आहेत. रविवारी मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी लोकांना कोविडशी संबंधित खबरदारीचे पालन करत राहण्याचे आवाहन केले होते.



    या बैठकीला पंतप्रधान मोदी यांच्यासह पंतप्रधान कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया आणि त्यांच्या मंत्रालयातील अधिकारीही या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मंगळवारी देशात एकाच दिवसात कोविडच्या २,४८३ नव्या रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशात आतापर्यंत कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांची एकूण संख्या वाढून ४३०६२५६९ झाली आहे. त्याचबरोबर उपचाराधीन रुग्णांची संख्या १५ हजार ६३६ इतकी कमी झाली आहे.

    Prime Minister Modi will hold a meeting with the Chief Minister today

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Robert Vadra : मनी लाँड्रिंग प्रकरणात वाड्रा यांची 5 तास चौकशी; संजय भंडारीशी आर्थिक संबंधांवरून EDने घेतली झाडाझडती

    लडाखमध्ये तब्बल 15000 फूट उंचीवर आकाश एअर डिफेन्स सिस्टीमची चाचणी यशस्वी; चिनी धोक्याला थेट प्रत्युत्तर!!

    Rahul Gandhi : राहुल गांधींचे लखनऊ न्यायालयात सरेंडर, 5 मिनिटांनी जामीन; सैन्यावरील टिप्पणीचा खटला