• Download App
    पंतप्रधान मोदी लष्करी जवानांसोबत काश्मीरमध्ये साजरी करणार दिवाळी|Prime Minister Modi to celebrate Diwali in Kashmir with Army personnel

    पंतप्रधान मोदी लष्करी जवानांसोबत काश्मीरमध्ये साजरी करणार दिवाळी

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दरवर्षी लष्करी जवानांसोबत दिवाळी साजी करण्याची परंपरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाच्या वर्षीही कायम ठेवणार आहे. पंतप्रधान यंदाच्या वर्षीही काश्मीरमध्ये लष्करी जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. काश्मीरमधील नौशेरा सेक्टर आणि राजोरीतील ब्रिगेड मुख्यालयात दिवाळी साजरी करून पंतप्रधान जवानांची उमेद वाढविणार आहेत.Prime Minister Modi to celebrate Diwali in Kashmir with Army personnel

    पंतप्रधानांनी २०१९ मध्ये राजोरी येथे जवानांसोबत दिवाळी साजरी करून त्यांचे मनोबल वाढविले होते. आताही पंतप्रधान पुन्हा जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. यासाठी लष्कराकडून सर्व प्रकारची तयारी करण्यात आली आहे. त्यासाठी लष्कराने हाय अलर्ट दिला असून दहशतवाद्यांच्या विरोधात ऑपरेशन सुरू केले आहे.



    राजोरी आणि पूंछ जिल्ह्यातील सीमा भागाजवळील घनदाट जंगलामध्ये गेल्या तीन आठवड्यांपासून आॅपरेशन सुरू आहे. विशेषत: राजोरी भागात विशेष काळजी घेतली जात आहे.पंतप्रधानांनी गेल्या वर्षी राजस्थानातील जैसलमेर येथील लोंगोवाला बॉर्डरवर दिवाळी साजरी केली होती.

    त्यांच्यासोबत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत आणि लष्करप्रमुख एम. एम. नरवणे होते. २०१४ मध्ये पंतप्रधानपदाचा कार्यभार घेतल्यापासून मोदी लष्करी जवानांसोबत दिवाळी साजरी करत आहेत. लष्करी जवानांकडून त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळतो.

    देशाच्या रक्षणासाठी कुटुंबियांपासून दूर राहावे लागणाऱ्या लष्करी जवानांची दिवाळी पंतप्रधानांच्या भेटीमुळे आनंददायी होते. यापूर्वी त्यांनी हिमाचल प्रदेश, उत्तराखंड पंजाब, राजस्थान आणि जम्मू-काश्मीरमधील सीमावर्ती भागात दिवाळी साजरी केली आहे.

    Prime Minister Modi to celebrate Diwali in Kashmir with Army personnel

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    OpenAI : ऑफिस कामात माणसांना मागे टाकणार एआय; OpenAI खऱ्या कामातून प्रशिक्षित करत आहे नवीन मॉडेल, नोकऱ्यांवर गंडांतर?

    Mani Shankar Aiyar : मणिशंकर अय्यर म्हणाले- ऑपरेशन सिंदूर संपवले पाहिजे, भारत सरकारने पाकिस्तानशी चर्चा करावी; भाजपचा पलटवार- काँग्रेसची ओळख, पाकिस्तान माझा भाईजान

    Owaisi : ओवैसी म्हणाले- आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात ट्यूबलाइट; त्यांना संविधानाची समज नाही; हिमंता म्हणाले- हे हिंदू राष्ट्र आहे, पंतप्रधानही हिंदूच असेल