वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तीन विकास प्रकल्पांचे संयुक्तपणे उद्घाटन करतील. पंतप्रधान कार्यालयाच्या (पीएमओ) अधिकृत निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे.Prime Minister Modi-Sheikh Hasina will inaugurate three development projects today, including the cross-border rail line
हे तिन्ही प्रकल्प भारताच्या सहाय्याने कार्यान्वित करण्यात आले आहेत. यामध्ये अखौरा-अगरतळा क्रॉस-बॉर्डर रेल्वे लिंक, खुलना-मोंगला पोर्ट रेल्वे लाइन आणि मैत्री सुपर थर्मल पॉवर प्लांट प्रकल्पाचे युनिट-3 यांचा समावेश आहे. अखौरा-अगरतळा क्रॉस-बॉर्डर रेल्वे लिंक प्रकल्प भारत सरकारने बांगलादेशला दिलेल्या 392.52 कोटी रुपयांच्या अनुदानाच्या अंतर्गत कार्यान्वित केला आहे. रेल्वे लिंकची लांबी 12.24 किमी असून बांगलादेशमध्ये 6.78 किमी ड्युअल गेज रेल्वे लाइन असून त्रिपुरामध्ये 5.46 किमी आहे, असे पीएमओच्या निवेदनात म्हटले आहे.
भारत सरकारच्या सवलतीच्या कर्ज सुविधेअंतर्गत खुल्ना-मोंगला पोर्ट रेल्वे लाईन प्रकल्प विकसित करण्यात आला असून त्याची एकूण किंमत 388.3 दशलक्ष अमेरिकी डॉलर आहे. या प्रकल्पामध्ये मोंगला बंदर आणि खुलना येथील विद्यमान रेल्वे नेटवर्क दरम्यान सुमारे 65 किमी ब्रॉडगेज रेल्वे मार्गाचे बांधकाम समाविष्ट आहे. यासह, बांगलादेशचे दुसरे सर्वात मोठे बंदर मोंगला ब्रॉडगेज रेल्वे नेटवर्कशी जोडले गेले आहे.
15 किमी लांबीचा आगरतळा-अखौरा क्रॉस बॉर्डर रेल्वे लिंक (भारतात 5 किमी आणि बांगलादेशात 10 किमी) सीमापार व्यापाराला चालना देईल आणि ढाका मार्गे आगरतळा ते कोलकाता प्रवासाचा वेळ देखील कमी करेल. सध्या आगरतळाहून कोलकात्याला पोहोचण्यासाठी ट्रेनला 31 तास लागतात, जे हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर 21 तासांवर कमी होईल.
Prime Minister Modi-Sheikh Hasina will inaugurate three development projects today, including the cross-border rail line
महत्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षणासाठी सरकारचे प्रामाणिक प्रयत्न तरी सत्ताधारी आमदारांचे उपोषण का??; अजितदादांच्या कानपिचक्या!!
- कंत्राटी भरतीचा शासन निर्णय अखेर रद्द; महाविकास आघाडीने नेमलेल्या एजन्सीला महायुतीचा मोठा दणका!
- पीयूष गोयल यांच्या फोनवरही आले नोटिफिकेशन, ‘Apple’ला उत्तर द्यावे लागेल – राजीव चंद्रशेखर
- दहशतवादी हल्ल्यात हेडकॉन्स्टेबल शहीद, घरात घुसून गोळी झाडली; तीन दिवसांत हल्ल्याची तिसरी घटना