• Download App
    पंतप्रधान मोदींनी वाचली गांधी - लालू - पवार ममतांच्या 20 लाख कोटींच्या घोटाळ्यांची यादी; घोटाळेबाजांना सोडणार नसल्याची दिली गॅरंटी!!|Prime Minister Modi read the list of Gandhi - Lalu - Pawar Mamata's 20 lakh crore scams; Guaranteed not to leave scammers!!

    पंतप्रधान मोदींनी वाचली गांधी – लालू – पवार ममतांच्या 20 लाख कोटींच्या घोटाळ्यांची यादी; घोटाळेबाजांना सोडणार नसल्याची दिली गॅरंटी!!

    वृत्तसंस्था

    भोपाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपच्या 10 लाख बूथ कार्यकर्त्यांसमोर केलेल्या भाषणात विरोधकांची पुरती पोलखोल केली. इतकेच नाही, तर विरोधकांना विरोधकांच्या 20 लाख कोटी रुपयांच्या घोटाळ्यांची यादीच मोदींनी पाठ म्हणून दाखविली. या कुठल्याही घोटाळेबाजाला सोडणार नाही. त्यांच्यावर कायद्याचा बडगा चालविणारच, याची गॅरंटीही मोदींनी दिली. सगळे घोटाळेबाज तुरुंगवारी चुकवण्यासाठी पाटण्यात एकत्र जमल्याची टीका देखील त्यांनी केली.Prime Minister Modi read the list of Gandhi – Lalu – Pawar Mamata’s 20 lakh crore scams; Guaranteed not to leave scammers!!

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसवर जवळपास 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.



    पंतप्रधानांनी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड निवडणुका आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला.

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या घोटाळ्याबाबत टीका करताना म्हटले की, “एनसीपीबद्दल बोलायचे झाले तर, एनसीपीवरही जवळपास 70000 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा, सिंचन घोटाळा, अवैध खाणकाम घोटाळा अशी त्यांची यादीही मोठी आहे, अशा शब्दांत मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे वाभाडे काढले.

    सध्या एक शब्द चांगलाच पसरवला जात आहे. तो शब्द म्हणजे गॅरंटी. वारंवार हा शब्द उच्चारला जात आहे. पण एकत्र विरोधक जमलेल्या विरोधकांची गॅरंटी ही किमान 20 लाख कोटींच्या घोटाळ्याची गॅरंटी आहे, अशी टीका मोदींनी केली.

    काँग्रेस, लालू, ममतांवरही गंभीर आरोप

    मोदी म्हणाले की, काँग्रेसचा घोटाळाच लाखो कोटींचा आहे. 1 लाख 86 हजार कोटींचा कोळसा घोटाळा, 1 लाख 74 हजार कोटींचा टूजी घोटाळा, हजारो कोटींचा राष्ट्रकुल घोटाळा यांचा समावेश आहे, असेही मोदी म्हणाले. सर्वच क्षेत्रात काँग्रेसने घोटाळा केल्याचा आरोप मोदी म्हणाले. त्याशिवाय राजदवर हजारो कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे, असे ते म्हणाले. चारा घोटाळा, अल कतरा घोटाळा, पशुपालन शेड घोटाळा राजदच्या घोटाळ्याची यादी एवढी मोठी आहे की, न्यायालयदेखील एकापाठोपाठ शिक्षा जाहीर करताना थकले आहे, असे मोदी म्हणाले. ममता बॅनर्जींच्या टीएमसीवरही 23 हजार कोटींपेक्षा जास्त घोटाळ्याचा आरोप आहे, असे मोदी म्हणाले.

    शारदा घोटाळा, रोझव्हॅली घोटाळा, शिक्षक भरती घोटाळा, गोतस्करी घोटाळा, कोळसा तस्करी घोटाळा याचा उल्लेख मोदींनी केला. बंगालचे लोक हा घोटाळा कधी विसरू शकत नाही, असे शरसंधान मोदींनी साधले.

    Prime Minister Modi read the list of Gandhi – Lalu – Pawar Mamata’s 20 lakh crore scams; Guaranteed not to leave scammers!!

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य