• Download App
    प्रसिद्ध कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार यांच्या आकस्मित निधनानंतर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक | Prime Minister Modi expressed grief over the sudden demise of famous Kannada actor Puneet Rajkumar

    प्रसिद्ध कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार यांच्या आकस्मित निधनानंतर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक

    विशेष प्रतिनिधी

    बेंगलोर : कन्नड चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता पुनीत राजकुमार यांच्या अकाली निधनाने देशभरात शोककळा पसरली आहे. सर्व स्तरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. ज्युनियर एनटीआर, महेश बाबू, चिरंजीवी, लक्ष्मी मंचू, आर माधवन, दुल्कर सलमान आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्यासह अनेक दक्षिणेकडील तारे तसेच बॉलिवूड कलाकारांनी देखील ट्विटरवर पोस्ट शेअर करत दुःख व्यक्त केले आहे. तसेच देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदींजींनी देखील ट्विटर वरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

    Prime Minister Modi expressed grief over the sudden demise of famous Kannada actor Puneet Rajkumar

    पॉवर स्टार आणि अपु या टोपण नावांनी पुनीत त्यांच्या चाहत्यांमध्ये प्रसिद्ध होते. पुनीत यांनी आपल्या वडिलांसोबतच बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीची सुरुवात केली होती. बेट्टाडा हूवू ह्या 1985 साली प्रदर्शित झालेल्या रामूच्या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. पुनीतने चालिसुवा मोडगालू आणि येराडू नक्षत्रगालू मधील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा कर्नाटक राज्य पुरस्कारही जिंकला होता.


    कन्नड चित्रपट अभिनेते पुनीत राजकुमार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन


    पुनीत यांनी 29 हून अधिक कन्नड चित्रपटांमध्ये काम केले. अप्पू (2002), अभि (2003), वीरा कन्नडिगा (2004), मौर्या (2004), आकाश (2005), अजय (2006), अरासू (2007) यासह अनेक व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपटांमध्ये ते मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत दिसले होते. मिलाना (2007), वामशी (2008), राम (2009), जॅकी (2010), हुदुगारू (2011), राजाकुमारा (2017), आणि अंजनी पुत्र (2017) ह्या सिनेमातील त्यांच्या भूमिकेचे कौतुक झाले होते.

    चाहते आणि हितचिंतकांनी विक्रम हॉस्पिटल बाहेर आपल्या लाडक्या कलाकाराच्या अंतिम दर्शनासाठी गर्दी केली होती. म्हणून सर्वांना अंतिम श्रद्धांजली अर्पण करता यावी यासाठी त्यांचे पार्थिव कांतीरवा स्टेडियममध्ये ठेवण्यात आले होते.

    Prime Minister Modi expressed grief over the sudden demise of famous Kannada actor Puneet Rajkumar

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Raghuram Rajan : रघुराम राजन म्हणाले- रशियन तेल खरेदीबाबत पुन्हा विचार व्हावा; याचा फायदा कोणाला?

    Lovely Anand : खासदार लवली आनंद म्हणाल्या- राहुल गांधींची यात्रा अयशस्वी; जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो