• Download App
    Prime Minister Modi आंबेडकरांच्या प्रतिमेसोबत लालूंच्या ‘त्या’ व्हायरल फोटोवर मोदींनी साधला निशाणा

    आंबेडकरांच्या प्रतिमेसोबत लालूंच्या ‘त्या’ व्हायरल फोटोवर मोदींनी साधला निशाणा

    राजद आणि काँग्रेसवर मोदींनी भाषणातून जोरदार टीका केली

    विशेष प्रतिनिधी

    सिवान – पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांनी सिवानमधील एका सभेला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, आज या व्यासपीठावरून हजारो कोटी रुपयांच्या योजनांची पायाभरणी करण्यात आली आहे. हे सर्व विकास प्रकल्प बिहारला उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जातील. हे प्रकल्प प्रत्येक समाजाचे जीवन सोपे करतील.

    तसेच, पंतप्रधान म्हणाले, आम्ही दाखवून दिले आहे की गरिबी कमी करता येते, जागतिक बँक देखील भारताची चाहती बनली आहे. आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांच्या व्हायरल फोटोवरही पंतप्रधान मोदींनी टिप्पणी केली. ते म्हणाले की, राजद बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या चरणी ठेवते, पण मोदी त्यांना हृदयात ठेवतात. बिहार बाबासाहेबांचा अपमान सहन करणार नाही.



    पंतप्रधान म्हणाले, मी कालच परदेशातून परतलो आहे. या दौऱ्यादरम्यान मी अनेक नेत्यांशी बोललो, सर्व नेते भारताच्या विकासाने खूप प्रभावित झाले आहेत. ते भारताला तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक शक्ती बनताना पाहत आहेत. बिहार यात खूप मोठी भूमिका बजावणार आहे.

    पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि राजदवर निशाणा साधला. पंतप्रधान म्हणाले, पंजा आणि कंदील असलेल्या लोकांनी मिळून बिहारचा स्वाभिमान खूप दुखावला आहे. या लोकांनी मिळून अशी लूटमार केली की गरिबी बिहारचे दुर्दैव बनली. अनेक आव्हानांवर मात करून, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारला पुन्हा विकासाच्या मार्गावर आणले आहे.

    Prime Minister Modi criticizes Lalu Prasad Yadav

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amarnath Yatra : अमरनाथ यात्रा एक आठवडा आधीच बंद; मुसळधार पावसामुळे बालटाल व पहलगाम दोन्ही मार्ग खराब

    Tejashwi Yadav : तेजस्वी यादव यांचा आरोप- माझे आणि पत्नीचे नाव मतदार यादीतून काढले; आयोगाने फेटाळला दावा

    Rahul Gandhi : राहुल गांधी म्हणाले- भारताची निवडणूक व्यवस्था मृत झाली; लोकसभा निवडणुकीत 15 जागांवर हेराफेरी