जाणून घ्या, दोन दिग्गज नेत्यांमध्ये नेमके काय झाले संभाषण? Donald Trump
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर तीन ताानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि 12 तासांतच दोन्ही नेत्यांमध्ये दूरध्वनीवरून संभाषण झाले. अध्यक्षीय निवडणूक जिंकल्यानंतर ट्रम्प यांच्याशी चर्चा करणारे पंतप्रधान मोदी हे पहिले जागतिक नेते ठरले. Prime Minister Modi called US President Trump
ट्रम्प यांना आपले मित्र मानून पंतप्रधान मोदींनी त्यांचा विजय केवळ ऐतिहासिकच नाही तर भारत आणि अमेरिका यांच्यातील धोरणात्मक संबंध अधिक दृढ करण्यासाठी त्यांच्यासोबत काम करण्याचा संदेशही दिला.
Amit Shah : दहशतवादाविरोधातील उपाययोजनांवर दोन दिवस विचारमंथन सुरू राहणार
यावेळी दोन्ही नेत्यांनी जागतिक शांततेसाठी एकत्र काम करणार असल्याचे सांगितले. आपल्या निवडणूक दौऱ्यांमध्ये अनेकदा मोदींचे नाव घेऊन त्यांचे खास मित्र म्हणून वर्णन करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा चर्चेदरम्यान पुनरुच्चार केला की ते मोदी आणि भारताला आपले खरे मित्र मानतात.
ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात 2019 मध्ये ‘हाऊडी मोदी’ आणि 2020 मध्ये ‘नमस्ते ट्रम्प’ सारख्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये दिसलेल्या मोदींसोबतच्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या मैत्रीचे रंग दुसऱ्या कार्यकाळातही कायम राहणार हे स्पष्ट आहे.
Prime Minister Modi called US President Trump
महत्वाच्या बातम्या
- Kamala Harris “या निवडणुकीचा निकाल तो नाही,जो…” पराभवानंतर कमला हॅरिसचा समर्थकांना संदेश
- Raj thackeray मला संधी द्या, एकाही मशिदीवर भोंगा लावू देणार नाही; अमरावतीतून राजगर्जना!!
- Mahavikas Aghadi : लाडकी बहीण योजनेविरोधात काँग्रेसचे नेते कोर्टात; पण महाविकास आघाडी सरकार महिलांना 3000 रुपये देणार!!
- Brampton : ‘ब्रॅम्प्टनमधील हिंदू मंदिरावरील हल्ल्याबाबत पोलिसांना होती सर्व माहिती ‘