• Download App
    पंतप्रधान मोदींचा राजस्थानमधील सभेतून काँग्रेससह I.N.D.I.A आघाडीवर हल्लाबोल, म्हणाले...|Prime Minister Modi attacked the INDIA alliance with the Congress from a meeting in Rajasthan

    पंतप्रधान मोदींचा राजस्थानमधील सभेतून काँग्रेससह I.N.D.I.A आघाडीवर हल्लाबोल, म्हणाले…

    सनातन धर्माबाबत विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांचा देखील मोदींनी उल्लेख केला आहे.


    विशेष प्रतिनिधी

    पाली : पंतप्रधान नरेंद्र मोदी एका जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी सोमवारी (20 नोव्हेंबर) राजस्थानच्या पाली येथे पोहोचले. येथे त्यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर जोरदार निशाणा साधला.Prime Minister Modi attacked the INDIA alliance with the Congress from a meeting in Rajasthan

    मोदी म्हणाले, “काँग्रेस आणि त्यांच्या अहंकारी आघाडीने सनातनबद्दल काय-काय नाही म्हटले ? काँग्रेस आणि त्यांचे मित्र सनातनला नष्ट करण्याच्या घोषणा करत आहेत. सनातनचा नाश करणे म्हणजे राजस्थानची संस्कृती नष्ट करणे. तुम्ही हे होऊ देणार का? तुम्ही त्यांच्या या कृत्यांना परवानगी द्याल का? अहंकारी आघाडीच्या या कृत्यांचा स्वीकार कराल का?”



    हनुमान मंदिरातील दलित समाजाच्या पुजाऱ्याचा उल्लेख करताना मोदींनी बिहारच्या मुख्यमंत्र्यांवरही हल्लाबोल केला. ते म्हणाले, “एवढ्या पवित्र भूमीवर काँग्रेसच्या आश्रयाने दलितांना लक्ष्य केले जात आहे. बिहारमध्ये तेथील मुख्यमंत्री असलेल्या अहंकारी आघाडीच्या एका नेत्याने दलित समाजाच्या माजी मुख्यमंत्र्यांविरोधात अशी अशोभनीय भाषा वापरली आहे. जे कोणीही सामान्य नागरिक म्हणू शकत नाही. ते सभागृहातही तीच भाषा बोलत आहेत. त्यांनी दलितांचा अपमान केला, पण काँग्रेसने त्याचा निषेधही केला नाही.”

    पंतप्रधान पुढे म्हणाले, “दलितांवर अत्याचार करणाऱ्यांना पाहून काँग्रेस डोळं बंद करते. राजस्थानमध्येही असेच घडले. महिलांना आरक्षण देणारा कायदा झाल्यापासून त्यांनी महिलांविरोधात अशोभनीय मोहीम सुरू केली आहे. आमच्या माता-भगिनींबद्दल या लोकांकडून कशी वक्तव्य केली जात आहेत. बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत आमच्या मातांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह भाषा वापरली आहे. तिथेही काँग्रेस गप्प राहिली, हाच काँग्रेसचा खरा चेहरा आहे.”

    Prime Minister Modi attacked the INDIA alliance with the Congress from a meeting in Rajasthan

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Masood Azhar : मसूद अझहर पाकच्या प्रत्येक जिल्ह्यात महिला दहशतवादी केंद्र उघडणार; 15 दिवसांचा दहशतवाद अभ्यासक्रम

    अंबालामध्ये राष्ट्रपतींसोबत ऑपरेशन सिंदूरची पायलट; स्क्वॉड्रन लीडर शिवांगी यांना पाकिस्तानने पकडल्याचा दावा केला होता

    Apple : अ‍ॅपलचे बाजारमूल्य पहिल्यांदाच 4 ट्रिलियन डॉलर्स पार; हे भारताच्या जीडीपीच्या बरोबर