• Download App
    पंतप्रधान मोदींच्या महत्त्वाकांक्षी योजनेत 508 पैकी महाराष्ट्रातल्या 44 रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट!!|Prime Minister Modi, 44 out of 508 railway stations in Maharashtra will be transformed!!

    पंतप्रधान मोदींच्या महत्त्वाकांक्षी योजनेत 508 पैकी महाराष्ट्रातल्या 44 रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : देशातील रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या  अमृत भारत स्थानक योजनेचा शुभारंभ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला, या योजनेत महाराष्ट्रातील 44 रेल्वे स्थानकांचा समावेश केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत.Prime Minister Modi, 44 out of 508 railway stations in Maharashtra will be transformed!!

    देशातील रेल्वे स्थानकांच्यादृष्टीने आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. देशातील 508 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यासाठी ‘अमृत भारत स्थानक’ योजनेचा शुभारंभ आज झाला आहे. या योजनेतून निर्माण होणाऱ्या सुविधांमुळे रेल्वे स्थानकांचा चेहरामोहरा बदलणार आहे, शिवाय प्रवाशांना दर्जेदार सुविधा मिळणार आहेत, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.



    ‘अमृत भारत स्थानक’ योजनेमुळे रेल्वे स्थानकांचे पुनरुज्जीवन होईल, शिवाय रेल्वे स्थानकातील प्रवेशाची ठिकाणे आणि स्थानक परिसराचा विकास, प्रतिक्षालये, स्वच्छतागृहे, लिफ्ट, एस्कलेटर, मोफत वायफाय, स्थानिक उत्पादनांच्या विक्रीसाठी स्वतंत्र केंद्रे, प्रवाशांना माहिती देण्यासाठी उद्घोषणा प्रणाली, दिव्यांगासाठी सुविधा आदी सुविधा टप्प्या-टप्प्याने करण्यात येणार आहेत, असे सांगून या विविध पायाभूत सुविधांच्या नव्या अध्यायाची नोंद रेल्वेच्या इतिहासात होईल, असा विश्वासही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

    अमृत भारत स्थानक योजनेत महाराष्ट्रातील रेल्वे स्थानके :

    सोलापूर रेल्वे विभाग – अहमदनगर, दौंड, कोपरगाव, कुर्डुवाडी जंक्शन, लातूर, उस्मानाबाद, पंढरपूर, सोलापूर

    पुणे रेल्वे विभाग – आकुर्डी, कोल्हापूर, तळेगाव

    भुसावळ रेल्वे विभाग – बडनेरा, मलकापूर, चाळीसगाव, मनमाड, शेगाव

    नागपूर रेल्वे विभाग – वडसा, गोंदिया, चांदाफोर्ट, बल्लारशाह, चंद्रपूर, धामणगाव, गोधनी, हिंगणघाट, काटोल, सेवाग्राम, नरखेड, पुलगाव,

    मुंबई रेल्वे विभाग – कांजुरमार्ग, परळ, विक्रोळी

    नांदेड रेल्वे विभाग – औरंगाबाद, गंगाखेड, हिंगोली डेकन, जालना, किनवट, मुदखेड, नगरसोल, परभणी, परतूर, पूर्णा, सेलू, वाशिम

    सिकंदराबाद रेल्वे विभाग – परळी वैजनाथ

    Prime Minister Modi, 44 out of 508 railway stations in Maharashtra will be transformed!!

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Pink e rickshaw महिलांसाठी महिलांद्वारे संचालित ‘पिंक ई-रिक्षा’!

    West Bengal : पश्चिम बंगालला बांगलादेशचे लाइट व्हर्जन बनवले; सुकांता मजुमदार यांचा ममता बॅनर्जींवर आरोप

    Murshidabad : मुर्शिदाबाद हिंसेत वडील-मुलाच्या हत्येप्रकरणी चौथी अटक; आरोपींनी मृताच्या घराची तोडफोड केली