प्रतिनिधी
मेरठ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मेरठमध्ये भारताचे हॉकी सुपरस्टार मेजर ध्यानचंद यांच्या नावाने होणाऱ्या क्रीडा विद्यापीठाचा शिलान्यास होत आहे. या कार्यक्रमाचा “राजकीय मुहूर्त” साधत समाजवादी पार्टीचे प्रमुख माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. Prime Minister lays foundation stone of Dhyanchand Sports University in Meerut; Criticism of “false game” by Akhilesh Yadav using “muhurat” !!
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मेरठ दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाचा शिलान्यास होत आहे. या आंतरराष्ट्रीय विद्यापीठाची विद्यापीठासाठी गुंतवणूक तब्बल 700 कोटी रुपयांची आहे. या आधी त्यांनी मेरठच्या काली पलटन मंदिरात जाऊन दर्शन घेतले तसेच 1857 स्वातंत्र्यसमरातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली.
पंप्रधानांच्या या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर अखिलेश यादव यांनी वेगळ्या प्रकारचे ट्विट करून टीका केली आहे. समाजवादी पक्षाच्या काळात उत्तर प्रदेशात क्रीडा क्षेत्रासाठी ज्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या होत्या, त्या सगळ्या भाजप राजवटीने बरबाद करून टाकल्या. कुस्ती, क्रिकेट, हॉकी, ॲथलेटिक्स या खेळांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना यशो भारती सन्मान हे विशेष पुरस्कार देण्याचे देण्याची योजना समाजवादी सरकारने अमलात आणली होती. ती भाजप राजवटीने बंद पाडली. मूळात उत्तर प्रदेशातील खेळांच्या पायाभूत सुविधा तयार करण्यात दिल्लीचे काही योगदान नाही. 2022 मध्ये भाजपचा “झूठा खेल” उत्तर प्रदेशची जनता बिघडवून टाकेल, असे टीकास्त्र अखिलेश यादव यांनी भाजपवर सोडले आहे.