• Download App
    पंतप्रधान - मुख्यमंत्र्यांच्या कौटुंबिक भेटीत प्रोटोकॉल बाजूला सारत वडिलांचा सन्मान!!|Prime Minister - Chief Minister's family visit honoring father by setting protocol aside!!

    पंतप्रधान – मुख्यमंत्र्यांच्या कौटुंबिक भेटीत प्रोटोकॉल बाजूला सारत वडिलांचा सन्मान!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींशी राजकीय चर्चा करायला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक राजधानी नवी दिल्लीत गेले. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा मराठी माध्यमांनी घडविल्या असली तरी प्रत्यक्षात नेहमीप्रमाणे मराठी माध्यमांचा गौप्यस्फोटाचा बॉम्ब फुसका ठरला.Prime Minister – Chief Minister’s family visit honoring father by setting protocol aside!!

    त्या उलट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आपल्या कुटुंबासह भेट घेतली आणि त्यावेळचे जे फोटो समोर आले त्यातून एक बाब अधोरेखित झाली, ती म्हणजे पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी प्रोटोकॉल बाजूला वडिलांचा सन्मान केला. पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान 7 लोककल्याण मार्ग येथे शिंदे कुटुंबाने पंतप्रधान मोदींची भेट घेतली. तेव्हा प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांच्या शेजारी मांडलेल्या खुर्चीवर बसायला हवे होते. त्या ऐवजी त्यांनी आपल्या वडिलांना पंतप्रधानांच्या शेजारी खुर्चीवर बसायचा मान दिला आणि पंतप्रधान मोदींनी देखील मुख्यमंत्र्यांच्या इच्छेचा आदर राखत मुख्यमंत्र्यांच्या वडिलांचा सन्मान केला.



    या भेटीत पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या नातवाबरोबर गप्पा मारल्या. त्याला खाऊ दिला. मुख्यमंत्र्यांचा मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या पत्नीशी संवाद साधला. कौटुंबिक वातावरणात ही भेट रंगली. पण त्याच वेळी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी प्रोटोकॉल बाजूला ठेवून वडिलांचा सन्मान केला ही बाब अधोरेखित झाली.

    पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानात मुख्य दालनात जेव्हा भेटीगाठी होतात, त्यावेळी पंतप्रधानांच्या उजवीकडे मांडलेल्या समान दर्जाच्या खुर्चीवर मुख्यमंत्री किंवा लोकप्रतिनिधींमधले सर्वोच्च नेते बसलेले असतात आणि बाजूच्या कोचांवर बाकीचे वरिष्ठ नेते अथवा अधिकारी बसतात. हा सर्वमान्य प्रोटोकॉल आहे. पण एकनाथ शिंदेंच्या कुटुंबीयांच्या भेटीच्या वेळी मात्र शिंदेंचे वडील पंतप्रधानांच्या शेजारी बसलेले दिसले. पंतप्रधानांनी त्यांचा शाल अर्पण करून सन्मान केला.

    Prime Minister – Chief Minister’s family visit honoring father by setting protocol aside!!

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    कर्नाटकच्या काँग्रेस सरकारची “कमाल”; 613 कोटींच्या भाड्याच्या यांत्रिक झाडूंनी बंगलोरचे रस्ते झाडणार!!

    Mehbooba Mufti : मेहबूबा म्हणाल्या- लाल किल्ल्यासमोर काश्मिरी समस्यांचे पडसाद; सरकारचे जम्मू-काश्मीर सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन, पण दिल्लीच धोक्यात

    India US : टॅरिफनंतर भारत-अमेरिका यांच्यात पहिला करार; भारत आपल्या गरजेच्या 10% गॅस अमेरिकेकडून खरेदी करणार