हमारा बजाज… हा केवळ शब्द समोर आला तरी आपल्या देशातील नागरिकांना एका वेगळ्या काळाची आठवण होते. एकेकाळी दुचाकींच्या बाजारपेठेवर बजाजच्या चेतक स्कूटरनं राज्य केलं आहे. दुचाकी घेणाऱ्या अनेकांचं स्वप्न ही स्कूटर खरेदी करण्याचं असायचं. अनेकांकडे तर आजही यातल्या काही स्कूटर या काही जणांनी कुटुंबातील सदस्य म्हणून जपल्या आहेत. संपूर्ण देशाचं बजाज चेतक बरोबरचं नातं वेगळं होतं. त्यामुळंच बजाजनं अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा त्यांचा बजाज चेतक हा ब्रँड बाजारात आणला आहे. विशेष म्हणजे त्यांना असा काही प्रतिसाद मिळाला की त्यांना बुकींग 48 तासांतच बंद करावं लागलं. कंपनीनं दोन वेळा या स्कूटरच्या किंमतीत वाढ केली असून आता ही स्कूटर बुलेटपेक्षाही महाग झाली आहे. Price of Bajaj Chetak scooter is more than bullet
हेही पाहा –