प्रतिनिधी
नवी दिल्ली : दक्षिण दिल्ली महापालिकेने अतिक्रमणविरोधात शाहीन बाग परिसरात सुरू केलेली बुलडोजर कारवाई आम आदमी पार्टीचे आमदार अमानतुल्ला खान यांनी झुंडशाही करून रोखून धरली. आज दुपारभर शाहीन बागेत बुलडोजर कारवाईचे राजकीय नाट्य रंगले होते. Prevented legal bulldozer action; But the Supreme Court rejected the CPM’s plea
शाहीन बागेत मूळात कोणतेही अतिक्रमण नाही. जे अतिक्रमण होते ते लोकांनी माझ्या आवाहनानुसार स्वतःहून काढून टाकले आहे, असा दावा आमदार अमानतुल्ला खान यांनी केला आहे. परंतु शाहीन बागेत अतिक्रमण विरोधी कारवाई करायचा चंग दक्षिणी दिल्ली महापालिकेने बांधला होता. यासाठी मोठा पोलिस फौजफाटा देखील महापालिकेने मागवला होता. त्यातच या फौज फाट्यातच अनेक बुलडोजर शाहीन बागेत कारवाईसाठी पोचले होते.
परंतु शाहीन बागेत सीएए आणि एनआरसी आंदोलनात जे चित्र दिसले होते, तसेच चित्र बुलडोजरची कायदेशीर कारवाई होत असताना देखील दिसले. सीएए – एनआरसी कायद्याविरोधात मुस्लिम महिलांना पुढे करून खरे सूत्रधार मागून आंदोलन करत होते. बुलडोजरच्या कायदेशीर कारवाईला देखील शाईन बागेतील मुस्लिम महिलांनाच पुढे करून मोठ्या प्रमाणावर विरोध करण्यात आला.
दरम्यानच्या काळात सुप्रीम कोर्टात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने शाहीन बागेतील बुलडोजर कारवाई रोखण्यासंदर्भातला अर्ज दाखल केला होता. त्यावर सुप्रीम कोर्टाने थेट सुप्रीम कोर्टात याचे कारण काय??, हायकोर्टात अथवा कनिष्ठ न्यायालयात जाता येत नाही का?? अशी फटकार लगावत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची याचिका फेटाळून लावली आहे. ही याचिका फेटाळल्यामुळे एक प्रकारे शाहीन बागेतील बुलडोजर कारवाई कायदेशीर असल्यावरच शिक्कामोर्तब झाले आहे. आता दक्षिण दिल्ली महापालिका पुन्हा एकदा उद्या अधिक पोलिस फौजफाट्यासह शाहीन बागेत अतिक्रमणविरोधी कायदेशीर कारवाई करणार आहे.
Prevented legal bulldozer action; But the Supreme Court rejected the CPM’s plea
महत्वाच्या बातम्या
- आढळराव – कोल्हे संघर्षाचे निमित्त : खरी लढाई शिवसेना – राष्ट्रवादीत वर्चस्वाची; राऊत – अजितदादा आमने – सामने!!
- धार्मिक कार्यक्रम रस्त्यावर करण्यास उत्तर प्रदेशात बंदी, योगी आदित्यनाथ यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश
- दीव नगर परिषदेतले 7 काँग्रेस नगरसेवक भाजपमध्ये!!; 15 वर्षांची सत्ता समाप्त!!
- NIA Nawab Malik : मलिकांचा साथीदार सुहेल खांडवानी माहीम दर्ग्याचा विश्वस्त!!; अस्लम सोरटियावरही छापे!!