नितीश कुमारांचे भविष्य ‘या’ नेत्याप्रमाणे असेल अशी भविष्यवाणीही प्रशांत किशोर यांनी केली आहे.
विशेष प्रतिनिधी
पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार त्यांचा तीन दिवसांचा दिल्ली दौरा संपवून मंगळवारी पाटणा येथे परतले. विरोधी पक्षांना एकत्र करण्याच्या मोहिमेचा एक भाग म्हणून नितीश यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अनेक नेत्यांची भेट घेतली.मात्र प्रशांत किशोर यांनी नितीश कुमारांवर निशाणा साधला आहे. Prashant Kishors criticism of Chief Minister Nitish Kumar
‘’स्वत:च्या घराचा ठिकाणा नाही आणि संपूर्ण जग फिरत आहेत. एकत्र बसून चहापान करून किंवा पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्ष एकत्र येत नसतात. तसे असते तर हे काम दहा वर्षांपूर्वी झाले असते.’’ असं प्रशांत किशोर म्हणाले आहे.
नितीश यांचे नशीबही नायडूंसारखे असेल –
नितीश कुमार अरविंद केजरीवाल यांची ४० दिवसांत दुसऱ्यांदा भेट घेतल्यावर प्रशांत किशोर म्हणाले की, ‘’नितीश काय करत आहेत यावर जास्त बोलण्याची गरज नाही. पाच वर्षांपूर्वी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू होते. त्यांचे बहुमताचे सरकार होते. त्यांनीही विरोधी पक्षांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला, परिणामी जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा राज्यात फक्त तीन खासदार उरले होते आणि 23 आमदार जिंकू शकले होते. इथे तर नितीश कुमार आधीच युतीमध्ये सरकार चालवत आहेत.”