विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपला प्रचंड बहुमत मिळाले आहे. मात्र, भारताच्या खºया लढतीचा निकाल २०२४ ला लागणार आहे, असे मत राजकीय रणनितीकारक प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.Prashant Kishor said, Saheb knows that BJP will have to give a real fight only in 2024
प्रशांत किशोर यांनी एका ट्विट केले आहे. त्यात म्हटले आहे की, देशात खरी लढाई ही २०२४ मध्ये लढली जाईल आणि त्यानंतरच निकाल येईल. विधानसभा निवडणुकांच्या या निकालाने काहीही फरक पडणार नाही. साहेबांना हे माहीत आहे! त्यामुळे राज्यांच्या निकालातून विरोधकांच्या विरोधात एक मानसिकता निर्माण करण्याची ही एक युक्ती आहे.
यामुळे या खोट्या धारणेला बळी पडू नका आणि त्याचा भाग बनू नका’, असे प्रशांत किशोर म्हणाले.विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी गुरुवारी पक्ष मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केले. विधानसभा निवडणुकांच्या या निकालांनी २०२४ चा निकाल निश्चित केला आहे, असा दावा पंतप्रधान मोदींनी केला होता. त्यानंतर आज प्रशांत किशोर यांचे हे वक्तव्य आले आहे.
Prashant Kishor said, Saheb knows that BJP will have to give a real fight only in 2024
महत्त्वाच्या बातम्या
- पेटीएम पेमेंट्स बँक आरबीआयच्या रडारवर ; नवीन ग्राहक नोंदणीला बंदीमुळे खळबळ
- पुणे शहरात 300 एकरवर इंद्रायणी मेडिसिटी
- Thackeray – Pawar Govt Unstable : महाविकास आघाडी अस्थिर; “वर्षा”वर बैठक; सत्ताधाऱ्यांना नंतर विरोधकही राजभवनावर!!
- रश्मी शुक्ला यांना हायकोर्टाचे आदेश १६ मार्च व २३ मार्चला पोलिसांकडून चौकशी