विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आम्ही पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाशी लढत होतो तेव्हा हे कोरोनाच्या नावाखाली घरी बसले होते. आता मला भाजपाचा एजंट म्हणताहेत, असा हल्लाबोल करत निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी कॉँग्रेसची अक्कल काढली आहे.Prashant Kishor draws the wisdom of Congress, When we were fighting against the BJP in Bengal, rhey were sitting at home under the name of Corona
‘द प्रिंट’ या न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत प्रशांत किशोर म्हणाले, मी आजपर्यंत केवळ एकदा भाजपाबरोबर काम केले. त्यानंतर सातत्याने इतर पक्षांबरोबर काम केले आणि ते पक्ष भाजपाशी लढत होते. पश्चिम बंगालची निवडणूक भाजपासाठी प्रतिष्ठेची होती. याठिकाणी ते आपल्या कथित एजंटला कसे पाठवितील?
पण कॉँग्रेसच्या मंडळींकडून माझ्यावर टीका सुरू आहे. तुमच्यातील कोणी तेथे लढायला गेले नाही. कोरोनाच्या नावाखाली सगळे घरी बसून राहिले. दिल्लीमध्ये पत्रकार परिषदा घेऊन आणि ट्विट करून लढता येत नाही. आम्ही तेथे लढलो, भाजपाला हरवलं आणि आता आमच्यावर टीका करत आहेत.
कॉँग्रेसवर टीका करताना ते म्हणाले, डावे पक्ष आणि आयएसएफसारख्या पक्षांबरोबर युती करून आपण कोणाच्या मतांना सुरूंग लावत होता? ममता बॅनर्जी यांचीच मते घेतली. कॉँग्रेसने असे वातावरण तयार केले आहे की कॉँग्रेस लढू किंवा लढू नये परंतु भाजपविरोधी म्हणून केवळ ते एकटेच आहेत.
बाकीचे पक्ष भाजपाविरोधात लढून जिंकले असले तरी ते भाजपाचे एजंट होतात. ज्याप्रमाणे देशात राष्ट्रवादाचे प्रमाणपत्र देण्याचे कंत्राट भाजपाने घेतले आहे असे म्हणतात तसे अॅँटी मोदी किंवा धर्मनिरपेक्ष असण्याचे प्रमाणपत्र देण्याचा ठेका कॉंग्रेसने घेतला आहे.
त्यामुळे माझे त्यांना सांगणे आहे की तुम्ही भाजपाशी लढा कारण साठ ते सत्तर ठिकाणी कॉँग्रेस आणि भाजपा असा थेट मुकाबला आहे. छोट्या-मोठ्या पक्षांबरोबर कशाला भांडणे करता.
Prashant Kishor draws the wisdom of Congress, When we were fighting against the BJP in Bengal, rhey were sitting at home under the name of Corona
महत्त्वाच्या बातम्या
- अहमदनगर मधील जवाहर नवोदय विद्यालयांमधील 52 विद्यार्थ्यांना कोरोणाची लागण
- नागालँडमधून AFSPA हटवण्याबाबत समितीची स्थापना, मुख्यमंत्री नेफियु रिओ यांची घोषणा
- ख्रिसमस निमित्त सांता क्लॉजचा ड्रेस घातलेल्या 100 स्त्रियांनी बंगलोर मध्ये ऑर्गनायझ केली बाईक रॅली
- पुलवामा येथील पोलीस चौकीवर दहशतवाद्यांनी केला ग्रेनेड हल्ला ; हल्ल्यात दोन पोलीस जखमी