निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी पुन्हा एकदा काँग्रेस पक्षावर हल्लाबोल केला आहे. प्रशांत किशोर म्हणाले की, काँग्रेसमध्ये लोकशाही नाही. पक्ष वाचवायचा असेल, तर लोकशाही पद्धतीने गांधी घराण्याच्या बाहेरच्या नेत्याला अध्यक्षपदी निवडून द्या. देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसशिवायही भाजपविरोधी आघाडी उभारणे शक्य असल्याचे ते म्हणाले.Prashant Kishor criticizes Rahul Gandhi In Interview, Says- It Is Difficult To Defeat Bjp By Tweet And Candle March
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी पुन्हा एकदा काँग्रेस पक्षावर हल्लाबोल केला आहे. प्रशांत किशोर म्हणाले की, काँग्रेसमध्ये लोकशाही नाही. पक्ष वाचवायचा असेल, तर लोकशाही पद्धतीने गांधी घराण्याच्या बाहेरच्या नेत्याला अध्यक्षपदी निवडून द्या. देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसशिवायही भाजपविरोधी आघाडी उभारणे शक्य असल्याचे ते म्हणाले.
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणाच्या चर्चांना उधाण
एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल करत म्हणाले की, ट्विट आणि कँडल मार्चच्या माध्यमातून तुम्ही भाजपला कधीही पराभूत करू शकत नाही. भाजप खूप मजबूत झाला आहे. मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपला पराभूत करण्यासाठी तुम्हाला मजबूत रणनीती बनवावी लागेल. प्रशांत किशोर म्हणाले की, 1984 नंतर काँग्रेसने एकही लोकसभा निवडणूक स्वबळावर जिंकलेली नाही. गेल्या दहा वर्षांत काँग्रेसचा ९० टक्के निवडणुकांमध्ये दारुण पराभव झाला आहे. काँग्रेस नेतृत्वाने पराभवाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे.
त्यांनी पीएम मोदींचे कौतुक केले. ते म्हणाले की, ते सर्व लोकांचे ऐकतात. ही त्यांची सर्वात मोठी ताकद आहे. लोकांना कशाची गरज आहे हे त्यांना माहीत आहे. पुढील काही दशके देशाचे राजकारण भाजपभोवती फिरणार असल्याचेही प्रशांत किशोर म्हणाले.
प्रशांत किशोर यांनी ट्विट केले होते की, “काँग्रेस मजबूत विरोधी पक्षासाठी प्रतिनिधित्व करते, परंतु विरोधी पक्षाचे नेतृत्व हा काँग्रेसचा दैवी अधिकार नाही. काँग्रेसने गेल्या 10 वर्षांत 90 टक्के निवडणुका गमावल्या आहेत. विरोधी नेतृत्वाचा लोकशाही पद्धतीने निर्णय घेऊ द्या.”
Prashant Kishor criticizes Rahul Gandhi In Interview, Says- It Is Difficult To Defeat Bjp By Tweet And Candle March
महत्त्वाच्या बातम्या
- Omicron @ 33 : दिल्लीत ओमिक्रॉनचा दुसरा रुग्ण, महाराष्ट्रात ३ वर्षांची मुलगी बाधित, मुंबईत कलम 144 लागू
- विश्वविजयी फुटबॉल स्टार दिएगो मॅराडोना ह्यूबोल्ट घड्याळ आसाम मधून जप्त; वाजिद हुसेन या चोराला अटक
- पुणे जिल्ह्यात १७ लाख रुपयांचा गुटखा पकडला ; यवत येथे पोलिसांची कारवाई
- इस्लामपूरचे “ईश्वरपूर” नामकरणाच्या आंदोलनात शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानची उडी