प्रशांत किशोर यांनी साधला निशाणा; म्हणाले मी लिहून देतो…
विशेष प्रतिनिधी
समस्तीपूर : राजकीय रणनितीकार आणि जन सूरज पदयात्रा काढणारे प्रशांत किशोर यांनी गुरुवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. प्रशांत किशोर म्हणाले की, मी नितीशकुमार यांच्या राज्याबाहेरील दौऱ्यांना फारसे गांभीर्याने घेत नाही. Prashant Kishor criticizes Nitish Kumar
ते म्हणाले, ‘तुम्ही माझे बंगालबाबतचे ट्विट पाहिले असेल, भारतीय जनता पक्षाला 100 जागा मिळणार नाहीत, असे मी म्हटले होते. त्याचप्रमाणे आता नितीश कुमार यांनी काहीही केले तरी त्यांच्या जदयूला पाच जागाही मिळणार नाहीत. मी लिहून देतो, जदयूचे जमिनीवर काहीच अस्तित्व नाही.
प्रशांत किशोर पुढे म्हणाले, ‘जर संघटना नसेल, नेता नसेल, प्रतिमा नसेल, तर जेडीयूला मत कोण देणार? निवडणूक अद्याप बरीच दूर आहे, मी आत्ताच प्रत्येकाबद्दल सांगू शकत नाही. मात्र जेडीयूला आता भविष्य नाही. जनता दल युनायटेड नावाच्या पक्षाचा शेवटचा काळ चालू आहे, त्या पक्षात काही गडबड आहे म्हणून नाही तर नितीश कुमार यांनीच आपल्या पार्टीचे क्रियाकर्म केले आहे. त्यांना आता जेडीयूची गरज नाही. त्यांना फक्त एवढेच हवे आहे की आपण मुख्यमंत्री राहावे मग पक्षाचे काहीही झाले तरी चालेल.
Prashant Kishor criticizes Nitish Kumar
महत्वाच्या बातम्या
- ‘मॅकडोनाल्ड’ आणि ‘सबवे’ नंतर आता ‘बर्गर किंग’ देखील मेनूकार्ड मधून टोमॅटो गेले गायब!
- ”कधी कधी वाटतं चांद्रयान करून काय फायदा? चंद्रावर जाऊन खड्डेच पहायचेत तर महाराष्ट्रात पाठवायचं ना..” राज ठाकरेंचा संताप!
- राष्ट्रवादी कुणाची? निवडणूक आयोगाची शरद पवार आणि अजित पवार गटाला नोटीस, उत्तरासाठी तीन आठवड्यांची मुदत
- मीडिया पर्सेप्शन पलीकडले भाजपचे ग्राउंड वर्क सुरू; महाराष्ट्राचे 40 आमदार ट्रेनिंगसाठी जाणार मध्य प्रदेशात!!