विशेष प्रतिनिधी
मुंबई :Prasad Lad बेस्टच्या निवडणुकीत उबाठा-मनसेचा पराभव झाला आहे. त्यांनी तो स्वीकारत सुहास सामंत यांचा राजीनामा घ्यावा. उमेश सारंग ज्यांनी बेस्ट कामगार पतपेढीमध्ये भ्रष्टाचार केला त्यांना उद्धव ठाकरे शिक्षा देत बेस्ट कामगारांना न्याय देणार का? असा सवाल भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे.Prasad Lad
आमदार प्रसाद लाड म्हणाले की, बेस्ट निवडणूक ही महायुतीम्हणून लढलो नाही. यामध्ये आम्हाला 7 जागांवर विजय मिळाला असून 4 जागांवर पुन्हा मतमोजणी सुरू आहे. ठाकरे ब्रँड म्हणून निवडणूक लढवणाऱ्यांना 1 ही जागा मिळाली नाही. त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला गेला आणि त्यांना एकही जागा मिळाली नाही याचा मला जास्त आनंद आहे.Prasad Lad
ठाकरेंनी संस्था उभी करुण दाखवावी
आमदार प्रसाद लाड म्हणाले की, ठाकरें बंधूंना सहकार कसा चालतो हे माहिती नाही. संस्था ओरबडणाऱ्यांना मराठी माणसाने जागा दाखवली. आता ठाकरे ब्रँडचा बोलबाला बंद होणार का? निवडणूक हरले की ते कारणे देत असतात. त्यांनी कारणे ठरवून घेतले आहे. उबाठाला जनतेने जागा दाखवली आहे. सहकारमध्ये काम करणे खूप अवघड असते, एखादी संस्था चालवणे किती अवघड आहे त्यांना समजणार नाही. संदीप देशपांडे, संजय राऊत यांना आरोप करणे सोपं आहे त्यांनी एखादी संस्था उभी करुण दाखवावी. आदित्य ठाकरेंनी एखादीतरी संस्था सुरू केली आहे का? यांना केवळ आरोप करता येतात बाकी काही जमत नाही.
..तर आमच्या जास्त जागा निवडून आल्या असत्या
आमदार प्रसाद लाड म्हणाले की, मनपाच्या लिटमस टेस्टमध्ये आम्ही जिंकलेलो आहे. आमच्या जवळपास 5 जागा अगदी कमी मतांनी पडल्या आहेत. 2158 मत ही अवैध ठरली आहे, ती झाली नसती तर आमच्या पॅनलचा आकडा मोठा दिसून आला असता. शंशाकराव यांच्यावर मला काही टीका करायची नाही. मी केवळ शिवसेनेच्या पॅनलवर टीका केली. जर दीड वर्षांमध्ये आमच्या 7 जागा येऊ शकतात तर पुढच्या 5 वर्षांमध्ये संपूर्ण सत्ता आमच्याकडे येऊ शकते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
Prasad Lad: Thackeray Brand’s ‘Correct Program’ In BEST Election
महत्वाच्या बातम्या
- India China : भारत-चीनमध्ये चर्चेची 24वी फेरी; चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांना जयशंकर म्हणाले, मतभेद हे वाद व्हायला नको, मोदींच्या चीन दौऱ्याची तयारी
- हवामानाचा अंदाज: आजही पावसाचा कहर? मुंबई, पुण्यासह 7 जिल्ह्यांना रेड अलर्ट; गडचिरोलीसह 4 जिल्ह्यांना यलो अलर्ट
- आज एकाच दिवशी पुतिन यांचा मोदींना फोन कॉल; चीनचे परराष्ट्र मंत्री दिल्लीत येऊन भारतीय परराष्ट्र मंत्र्यांना भेटले!!
- Trump : डोनाल्ड ट्रम्प म्हणाले- युक्रेनला नाटोत घेणार नाही; क्रीमियाही परत मिळणार नाही