देशातील पहिले ‘सेव्हन स्टार’ शाकाहारी हॉटेलही बांधले जाणार आहे.
विशेष प्रतिनिधी
लखनऊ : अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्त विकासकामंची भेट मिळण्याची प्रक्रिया सुरूच आहे. दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दोन मोठ्या घोषणा केल्या. ते म्हणाले की, अयोध्येत ‘सेव्हन स्टार’ हॉटेल बांधले जाईल ज्यामध्ये फक्त शाकाहारी जेवण दिले जाईल आणि दरवर्षी रामलल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्याची घोषणाही त्यांनी केली.Pranapratistha festival will be celebrated in Ayodhya every year announcement of yogis
हा कार्यक्रम हुबेहूब दीपोत्सवासारखा असेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. मात्र, त्यांनी संबंधित हॉटेलचे नाव सांगण्याचे टाळले आणि नंतर घोषणा केली जाईल, असे सांगितले. त्यांनी सांगितले की, सध्या अयोध्येसाठी हॉटेल क्षेत्राचे २५ हून अधिक प्रस्ताव आले आहेत. त्यापैकी एकाने सेव्हन स्टार हॉटेलमधून शुद्ध शाकाहारी जेवण देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. जे काम 10 वर्षांपूर्वी पूर्ण व्हायला हवे होते ते आज केले जात आहे.
शिवाय येथील विकासाबाबतही त्यांनी चर्चा केली आणि सांगितले की, रस्ते, हवाई आणि रेल्वे कनेक्टिव्हिटी व्यतिरिक्त बरेच काही घडले आहे. रस्त्यावरून हटविण्यात आलेले छोटे व्यापारी आणि पथारी विक्रेते इतरत्र थाटले आहेत. त्यांच्या व्यवसायासाठीही व्यवस्था करण्यात आली आहे.
एका प्रश्नाच्या उत्तरात योगी म्हणाले की, गेल्या रामनवमीला 5 लाख भाविक अयोध्येत येतील असा अंदाज होता, त्यांची संख्या 35 लाखांच्या पुढे गेली होती. त्यावेळी सर्व रस्ते खोदण्यात आले होते. योग्य व्यवस्था नव्हती, पण आता परिस्थिती वेगळी आहे. आता भाविकांना थांबवण्याची व्यवस्था केली आहे. आम्ही दररोज 50,000 भाविकांच्या राहण्याची व्यवस्था करत आहोत. ट्रस्ट, प्रशासन आणि स्वयंसेवी संस्था या व्यवस्थेत गुंतल्या आहेत.
Pranapratistha festival will be celebrated in Ayodhya every year announcement of yogis
महत्वाच्या बातम्या
- मालदीवचे टुरिझम मार्केट आता तुम्हीच सुधारा; चीन धार्जिण्या अध्यक्षांनी टाकली चीनवरच जबाबदारी!!
- शाजापूरमध्ये अक्षत कलश यात्रेवर हल्लेखोरांची दगडफेक, परिसरात कलम 144 लागू
- खर्गे, ममता, पवारांची वक्तव्ये Off track; सौदी अरब अध्यक्षांसह मोदी On the Ram track!!
- भयानक : चार वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह बॅगेत घेऊन जाणाऱ्या स्टार्ट अपच्या CEOला बंगळुरुमध्ये अटक