• Download App
    पंजाबला वीजटंचाईने ग्रासले ; सहा युनिट बंद; कोळशाचा अपुरा पुरवठा |Power cut in Punjab

    पंजाबला वीजटंचाईने ग्रासले ; सहा युनिट बंद; कोळशाचा अपुरा पुरवठा

    विशेष प्रतिनिधी

    जालंधर – पंजाबमध्ये वीज संकट अधिक गडद होत चालले आहे. कोळशाच्या टंचाईमुळे वीज उत्पादन निम्म्यावर आले आहे. पंजाबमध्ये काल आणखी एक औष्णिक विद्युत केंद्र बंद पडले. गोइंदवाल साहिब येथील एक युनिट बंद करावे लागल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.Power cut in Punjab

    तत्पूर्वी शनिवारी पाच युनिट बंद केलेले असताना त्यापैकी एक युनिट पुन्हा कार्यान्वित करण्यात आले. सध्या खासगी औष्णिक विद्युत केंद्राकडे केवळ ३६ तास पुरेल एवढाच कोळसा शिल्लक राहिला आहे.



    सध्या पंजाबमध्ये सुरू असलेल्या वीज प्रकल्पात निम्मीच वीज तयार होत आहे. त्यामुळे पंजाबच्या नागरिकांना १५ ऑक्टोबरपर्यंत चार ते सहा तासाच्या भारनियमनाचा त्रास सहन करावा लागणार आहे. पॉवरकॉमचे अधिकारी ए.वेणुप्रसाद म्हणाले,

    की गरजेनुसार कोळशाची उपलब्धता होत असल्याने वीजपुरवठा अपुरा राहत आहे. आम्हाला २२ रॅकची गरज असताना ११ रॅक कोळसा उपलब्ध होत आहे. त्यामुळे मागणी आणि उत्पादन यात बरेच अंतर झाले आहे.

    Power cut in Punjab

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    yogi adityanath : मणिकर्णिका वादावर योगी म्हणाले- काशीला बदनाम करण्याचा कट; AI व्हिडिओमुळे काँग्रेसने दिशाभूल केली, त्यामुळे मला यावे लागले

    Sambit Patra : भाजपने म्हटले-₹10 हजारात बांगलादेशी-रोहिंग्यांना नागरिकत्व देत आहेत ममता, म्हणूनच ईडीच्या धाडीने घाबरल्या

    Modi : मोदी म्हणाले- TMC घुसखोरांना मतदार बनवत आहे; यांना वसवून गरिबांचा हक्क हिरावला जात आहे, भाजप यांना देशाबाहेर काढेल